शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:21 IST

पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला.

औरंगाबाद : पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आणि ४४ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे ठरले.

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई तंत्रनिकेतन, एमआयडीसी चिकलठाणा येथे तीनदिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण सभापती मीना शेळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. बी. चव्हाण, साई तंत्रनिकेतन संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव, विनायक बोरसे, प्राचार्य अरुण सातपुते, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांची उपस्थिती होती.

या प्रदर्शनात औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी ६२ प्रयोग सादर केले आहेत. शैक्षणिक संसाधने, लोकसंख्या शिक्षण या विषयावर शिक्षकांनी २६, व्यवसाय शिक्षण या विषयावर ७, तर प्रयोगशाळा सहायक या विभागात ३ प्रयोग सादर करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. १९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.

कृषी आणि जैविक शेती, आरोग्य आणि स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि दळणवळण (संप्रेषण), गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले होते. यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कृषी आणि जैविक शेती, संसाधन व्यवस्थापन या विषयावरील प्रयोग सादर केले आहेत.चौकट :जैविक प्लास्टिक या विषयावर वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर या शाळेने सादर केलेला प्रयोग नावीन्यपूर्ण होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मक्याचे पीठ, व्हिनेगर, ग्लिसरीन आणि पाणी या पदार्थांपासून प्लास्टिकसारखे गुणधर्म असणारी भांडी तयार केली.पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिर शाळेने बॉटल ट्री गार्ड उपक रण तयार केले. प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांपासून बनविलेले ट्री गार्ड झाडांभोवती बसविल्यामुळे अत्यंत कमी पाण्यातही झाडाला योग्य पाणीपुरवठा कसा होऊ शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

 

टॅग्स :scienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद