शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 19:35 IST

सदनिकांमध्ये राहणाऱ्यांना प्रशासनाने दिली आठ दिवसांची नोटीस

औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनी येथील २० एकर जागेतील शासकीय इमारती धोकादायक आणि राहण्यास योग्य नसल्याने त्यावर ८ नोव्हेंबर रोजी बुलडोझर फिरविण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने महापालिका, बांधकाम विभागाने रविवारी रात्री जारी केली. तेथील रहिवाशांना आठ दिवसांत सदनिका खाली कराव्या लागणार आहेत.

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके प्रशासकीय यंत्रणा फोडणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या काळात लेबर कॉलनी क्वार्टर्सबाबत निर्णय झाला होता. परंतु लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे ती संचिका धूळखात पडली होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सरकारी जागा ताब्यात घेण्यासाठी पाऊल टाकले आहे.शासनाची मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री करून व शासकीय मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. नोटीसवर मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. खडेकर यांची नावे आहेत.

विश्वासनगर येथे ३३८ सदनिका आहेत. १९५३-५४ व १९८० ते १९९१ या कालावधीमध्ये सा. बां. विभागाने बांधलेल्या संपूर्ण निवासस्थानांची देखभाल १९५३-५४ पासून करण्यात येत आहे. १९८५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढलेले आहेत. ते आदेश सर्व न्याय संस्थांनी कायम ठेवले आहेत. २००४ मध्ये बांधकाम विभागाने सदनिकाधारकांना नोटीसही बजावली होती. या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चर ऑडिटही करण्यात आले आहे. त्यामुळे त्या इमारती पाडाव्या लागणार आहेत.

ती पूर्ण जागा शासनाचीशासकीय सेवा निवासस्थानांमध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या व शासकीय निवासस्थानांची बेकायदेशीर विक्री व भाडे कराराने हस्तांतरण करणाऱ्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. ती जागा शासनाची आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण करून राहणे ही फसवणूकच आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात तेथे राहणाऱ्यांचे अपील फेटाळण्यात आले आहे.

ही एक प्रकारची फसवणूकचशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १९८०-८१ पूर्वी तात्पुरत्या काळासाठी सदनिका दिल्या होत्या. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. काही जण मयत झाले. तरीही अनेकांनी बांधकाम विभागाकडे सदरील जागेचे हस्तांतरण केलेले नाही. त्यांच्या वारसांनी त्या निवासस्थानात पोटभाडेकरू ठेवले. घरकुल विकले. ही एक प्रकारची फसवणूक आहे, असे प्रशासकीय नोटिसीत नमूद आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद