शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंदोलन : मराठवाडा विकास कृती समितीतर्फे विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.मराठवाडा विकास कृती समितीचे अ‍ॅड. मनोज सरीन, सतीश शिंदे, सतीश साळवे, अमोल दांडगे यांनी उपोषण सुरू केलेआहे.यासंदर्भात त्यांनी राज्यपाल, तसेच उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यकाळातील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. ही चौकशी नि:पक्षपातीपणे होण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यातयावे.चौकशी समितीने तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना कराव्यात, चौकशी समितीसंदर्भात शासन निर्णयात केवळ ८ तक्रारींच्या नोंदी आहेत.उर्वरित ३१ तक्रारीसंबंधीच्या नोंदी आढळून येत नाहीत. त्यासंबंधीच्या नोंदी शासनाच्या संकेतस्थळवार प्रसिद्ध करण्यात याव्यात, ज्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने चौकशी समितीचा शासन निर्णय जारी झालेला आहे, ते अधिकारी विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनास उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. चोपडे होते. याशिवाय विविध समिती व मंडळावर बेकायदेशीर नेमलेले डॉ. शंकर अंभोरे समन्वयक म्हणून उपस्थित होते. त्यामुळे यांचे टेलिफोन रेकॉर्ड मागविण्यात यावे, ज्यामुळे या चौकशीसंबंधीचे गौडबंगाल समोर येईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयagitationआंदोलन