मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:02 AM2021-06-16T04:02:01+5:302021-06-16T04:02:01+5:30

रोजगार, उच्चशिक्षण मिळत नसल्याने मुस्लीम समाज पिछाडत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरीत, शैक्षणिक ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी ...

Demand for reservation to the Muslim community | मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी

googlenewsNext

रोजगार, उच्चशिक्षण मिळत नसल्याने मुस्लीम समाज पिछाडत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरीत, शैक्षणिक ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात कृती समितीने केली आहे. या शिवाय मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात येणारे कर्ज २५ लाखांपर्यंत करावे. प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात यावेत आदी मागण्यात यात केल्या आहेत. यावेळी ॲड.अभय टाकसाळ, सय्यद अजीम, फिरोज खान, के.ए.पठाण, शेख वाहेद, शेख बब्बू, शेख अनिस, अब्दुल मोहिब उपस्थित होते. महाराष्ट्र जनजागरण समितीतर्फे निवेदन दिले. आरक्षणचा निर्णय न झाल्यास, राज्यात १ जुलैपासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनावर जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहमद, चरणसिंग गुलाटी, फजल उल्लाह खान, शेख मुनाफ, मिर्झा अलीम बेग, व्ही.व्ही. देशमुख, मो.जकिरोद्दीन, अजरा जबीन, एजाज जैदी, नाजद कादरी, निसार खान, अजमल खान, सलमा बानो, मोहसिना बिलकीस, मुजाहेद खान आदींची उपस्थिती होती.

Web Title: Demand for reservation to the Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.