शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'ड्राय डे' ला मागणी पूर्ण करण्याची तयारी; तरुणाने झोमॅटोच्या बॅगमधून केली दारूची ‘डिलिव्हरी’

By सुमित डोळे | Updated: April 18, 2024 15:15 IST

पोलिसांना चकवा देण्याची नवी शक्कल; १०३२ बाटल्यांसह तरुण रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांना चकवा देण्यासाठी तसेच ग्राहकांना थंड बीअरचा पुरवठा करण्यासाठी छावणीच्या तरुणाने चक्क झोमॅटो बॅगमधून दारूची ‘डिलिव्हरी’ सुरू केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने छावणीच्या एका डेली निड्स दुकानावर छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली. प्रतीक किसनलाल जैस्वाल (२६) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून विदेशी दारू व बीअरच्या १,०३२ बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला.

गेल्या आठ दिवसांमध्ये सर्वत्र सण, उत्सवानिमित्त तीन वेळा ड्राय डे घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अवैधरीत्या दारूचा साठा करून विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांना गुप्त बातमीदारातर्फे छावणीत एका नाष्ट्याच्या छोट्या हॉटेलमधून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. बुधवारी चौधरी यांनी निरीक्षक गणेश नागवे, पूनम चव्हाण, प्रियंका राठोर, प्रवीण पुरी यांच्यासह त्या ठिकाणी छापा मारला. तेव्हा जैस्वालच्या दुकानात विदेशी दारू, बीअरच्या एकूण १,०३२ बाटल्या आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्याच्यावर यापूर्वीदेखील दोन वेळा कारवाई करण्यात आली होती.

झोमॅटो बॅग कशासाठी?छावणी परिसरात एकच बार आहे. ड्राय डेला तो बंद असल्यावर कॉलवरदेखील दारूचा पुरवठा करतो. निवडणूक काळात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने झोमॅटोच्या खाद्यपदार्थ पुरवठा होणाऱ्या पॉलिस्टर फॅब्रिकच्या बॅगमधून पुरवठा सुरू केला. शिवाय, त्यात बीअर असल्यास त्या गारदेखील राहाव्यात, या उद्देशानेदेखील त्याचा वापर केला. त्याच्याकडे दारू पिण्यासाठी येणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनेच त्याला त्या बॅग दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. जवान चेतन वानखेडे, हनमंत स्वामी, ज्ञानेश्वर सांबारे, किशोर सुंदर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी