शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आनंददायक ! औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठे सुखना धरण पूर्ण क्षमतेने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:39 IST

जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ

ठळक मुद्दे2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

- श्रीकांत पोफळेकरमाड  : औरंगाबाद तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेले गारखेडा (ता.औरंगाबाद) येथील सुखना धरण ३१ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले. 2006 नंतर पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. मागील वर्षी याच दिवशी हे धरण पूर्ण कोरडे होते. जुलै महिन्यात धरण भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथील लहुकी , लाडसावंगी येथील बाबुवाडी , दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव आदी धरणे आहेत. दरम्यान, यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. यावर्षी सगळीकडेच पावसाळ्याच्या सुरूवातीपासुनच चांगले पर्जन्यमान राहिले आहे. सुखना नदीच्या उगमावरही सुरूवातीपासुन चांगला पाऊस होत असल्याने कोरड्याठाक पडलेल्या या सुखना धरणात दोन महिन्यांतच शंभर टक्के पाणीसाठा झाला. 

मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात या धरणात फक्त 15% पाणीसाठा उपलब्ध होता. तत्पूर्वी तर ते कोरडे होते व त्यानंतर उन्हाळ्यापुर्वीच ते पुन्हा कोरडे पडले होते. दरम्यान, आता ते पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचक्रोशीसह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. सांडव्यातुन पाणी वाहतानाचे व धरणातील पाणीसाठ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गारखेडा येथे रोजच बघ्यांची मोठी प्रमाणात गर्दी होत आहे.

या भागातील पिंप्रीराजा व  आडगाव खुर्द हा परिसर 25 वर्षापुर्वी याच धरणाच्या भरोशावर मोसंबीचे माहेर घर बनला होता. या धरण व आसपासच्या परिसरात सुमारे तीन हजार शेतकर्‍यांनी आपल्या विहीर खोदून येथून कमीत-कमी तीन ते पंधरा किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेल्या आहेत. याशिवाय 15 ते 20 गावालाही येथून पाणीपुरवठा होतो. यावर खासगी शेतकर्‍यांचे व शासकीय योजना मिळुन कोट्यावधी रूपये खर्च झालेले आहेत. तथापि, मागील कित्येक वर्षांपासुन हे धरण नेहमीच कोरड्या अवस्थेत राहत असल्याने पुर्वीचे बागायतदार आता कोरडवाहू शेतकरी बनले आहेत. शिवाय शेती तोट्यात गेली ती वेगळीच. उभारणीपासुन विभागाकडे असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत हे धरण फक्त सहा वेळाच पूर्ण क्षमतेने भरले आहे.

धरण पाळूला बाभूळ व इतर काटेरी झाडांचा धोका

पाटबंधारे विभागाकडुन दरवर्षी दुरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होत असते. वास्तविक पाहता किरकोळ डागडुजी व कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यापुरत्याच झाडांची कत्तल होत असते. आजस्थितीत मुख्य पाळुवर मोठ-मोठया सुबाभूळ, इतर काटेरी झाडी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे भविष्यात धरणाला तडे जाऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा गारखेडा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र, संबंधित यंत्रणेच्या पाहणीतुन धरण पुर्णपणे सुरक्षित असुन थोडया फार प्रमाणात काटेरी झुडपे आहेत व ती ही लवकरच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

दोनच महिन्यात धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने आता डाळींब मोसंबीच्या बागांसाठी उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागणार नाही. शिवाय परिसरातील पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध होईल याचे समाधान आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने अनावश्यक झाडांची त्वरीत कत्तल करावी. - काकासाहेब चौधरी, शेतकरी गारखेडा.

धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात वर्षापुर्वी विहीर खोदत पाईपलाईन आणत लाखो रूपये खर्च केले. परंतु, एकदाही धरण 30 टक्क्याच्यावर न भरल्याने खर्च करून देखील फारसा उपयोग होत नव्हता. आता धरण भरल्याने त्याचा निश्चित फायदा होणार आहे. - दीपक पोफळे , शेतकरी हिवरा.

◆धरणाविषयी माहिती● स्थापना  :  1965● साठवण क्षमता :  21.35 दशलक्ष● घनमीटर जिवंत साठा : 18.52 दलघमी● मृतसाठा : 2.85 दलघमी

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस