सध्याची पिढी समाज माध्यमांच्या जाळ्यात गुंतलेली असतांना येथील मोडकळीला आलेल्या वाचनालयाच्या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी करून नगर परिषदेने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मोठा हातभार लावला आहे, आजमितीला या वाचनालयात जवळ जवळ अकरा हजाराच्या वर ग्रंथ असून वाचनप्रेमींनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे प्रतिपादन कैलास पाटील यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्षा मंगलबाई राजपूत, बांधकाम सभापती अविनाश पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, विजय पानकडे, नगरसेविका फरीदाबेगम मोहसीन चाऊस, नगरसेवक ॲड. दत्तात्रय साबणे, कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, मारोती खैरे, ॲड. भानुदास जोशी, संतोष जोशी ,शामसुंदर धूत, मोहसीन चाऊस,सुरेश नेमाडे आदींची उपस्थिती होती.
फोटो : लोकमान्य वाचनालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करताना माजी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, नगरसेवक विजय पानकडे, मोहसीन चाऊस, कैलास साबणे आदी.