शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत दरवर्षी दोन मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:38 IST

पाच वर्षांत १२ मीटरने पातळी खालावली, यंदा दोन मीटरची भर

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्यापाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे. 

भूजल सर्वेक्षणतर्फे जिल्ह्यातील १४१ स्थिर निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीची गत ५ वर्षांतील सरासरी आकडेवारी घेतली असता धक्कादायक अवस्था दिसते आहे. मागील पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ११.४८ मीटर (४० फूट) खोल गेली. यंदा २०१९ मार्च महिन्यात ही पाणी पातळी आणखी दोन मीटरने खालावली आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ किंचितही जाणवत नसून, ती वरच्या वर पुन्हा खालावत असल्याचे भयावह चित्र समोर आहे.

उन्हाचा पारा वाढला असून, जमिनीतील पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली आहे. मे महिन्याची सुरुवात झाली असून, यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी अद्याप काही सांगता येत नाही. दरवर्षीचा हवामानाचा अंदाज अचूक ठरला नसल्याने शेतकरीही चिंतातुरच आहेत. सध्याच चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातही टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. जनावरांच्या चारा छावण्या सुरू झाल्या आहेत; परंतु पाणी प्रश्न सतावतो आहे. 

याविषयी कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, भूजल पातळीची मागील ५ वर्षांतील स्थिर भूजल पातळीशी तुलनात्मक स्थिती तपासली आहे. त्यात सतत घट दिसते आहे. मे महिन्यातील शेवटी पुन्हा स्थिती मोजली जाणार आहे. 

झपाट्याने घट होत आहेजिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, यंदा पुन्हा २ मीटरने घट झालेली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ ची आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही.-डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, औरंगाबाद विभाग

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ