लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्यांना आर्थिक मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली. यासंदर्भातील निवेदनात आमदार मलिक यांनी नमूद केले आहे, की वाशिम जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात शेतकरी सोयाबिनची पेरणी करतात. विशेषत: वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघामध्ये सोयाबीनची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण घटल्याने दुष्काळसदृष स्थिती उद्भवली आहे. सुरूवातीच्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शे तकर्यांच्या शेतातील सोयाबीन नुसतेच हिरवेगार झाले; पण झाडांना एकही शेंग लागली नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. परिणामी, एकरी क्विंटलभर सोयाबिनचे उत् पादन झाले तरी खूप, अशी स्थिती सद्या निर्माण झाली आहे. नापिकीच्या संकटामुळे खरिप हंगामासाठी आतापर्यंत झालेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. विदर्भात वाशिम जिल्हा सर्वात जास्त शेतकरी आ त्महत्येचा जिल्हा असून शेतकर्यांवर ओढवणारे नवे आ िर्थक संकट आणि जिल्ह्यातील विहीरी, गावतलाव, जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या प्रकल्पांमध्ये पाऊस न आल्यामुळे एकही थेंब पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही बाब लक्षात घेवून वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचे तत्काळ सर्वेक्षण करून जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी आमदार मलिक यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विशेष मागणीस अनुकुलता दर्शविली असून शेतकर्यांचे हित जोपासता येईल, असा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार मलिक यांनी कळविली.
जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:39 IST
वाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्यांना आर्थिक मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली.
जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा!
ठळक मुद्दे आमदार लखन मलिक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा