शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाचा सहा आठवड्यांत निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:30 IST

हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश बकले यांनी या वाळू उपशाविरुद्ध जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना वारंवार निवेदने दिली. दुष्काळामुळे हर्सूल तलाव आटला आहे. तलावाचा तळ उघडा पडला आहे. अवैध वाळू उत्खनन सुरू असून सुपीक माती वीटभट्ट्यांसाठी वापरण्यात येत आहे.

तलावाची भिंत आणि बांधही कोरण्यात आलेला आहे. त्यामुळे भिंत आणि बांध केव्हाही कोसळू शकतो, असा उल्लेख त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे. मात्र, त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्या नाराजीने त्यांनी अ‍ॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फ त खंडपीठात सदर याचिका दाखल केली. सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाºयांना सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला.

तसेच याविषयीचा निर्णय घेताना संबंधित विभागाकडून अभिलेखे मागवू शकता तसेच संबंधितांना सुनावणीची संधी देऊ शकतात आणि त्यानुसार याचिकाकर्त्याच्या निवेदनावर निर्णय घेऊ शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. अ‍ॅड. गोरे यांना अ‍ॅड. नारायण मातकर आणि अ‍ॅड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय