शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
3
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
4
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
5
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
6
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
7
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
9
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
11
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
12
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
13
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
14
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
17
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
18
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा गोंधळ कायम! वैजापूरमध्ये सत्कार झालेला शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:08 IST

‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर बुधवारी संध्याकाळपर्यंत याद्या अपलोड झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांची कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देकिती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र हे गुलदस्त्यातपात्र शेतक-यांची यादी उपलब्ध न झाल्याने बळीराजाला कर्जमाफीसाठी वाट बघावी लागत आहे.

- मोबीन खान वैजापूर ( औरंगाबाद ) : दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द मुखमंत्र्यांनी दिला होता, त्यानुसार शेतक-यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या तालुक्यातील केवळ एकाच शेतक-याचा प्रातिनिधिक सत्कार ‘नरक चतुर्दशी’च्या दिवशी करण्यात आला. तसेच ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर कर्जमाफीस पात्र ठरलेल्यांच्या याद्या टाकल्याचे जाहीर केले होते. मात्र; ‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर बुधवारी संध्याकाळपर्यंत याद्या अपलोड झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांची कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीच्या लाभासाठी शासनाने आॅनलाइन अर्ज प्रक्रिया राबविली होती. आॅनलाइन प्रक्रियेतील विविध अडथळ्यांमुळे अर्ज भरण्याच्या मुदतीत दोन वेळा वाढ करण्यात आली होती. २२ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ८४ हजार शेतकºयांपैकी (खातेदार) ७७ हजार ९८४ शेतक-यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन अर्ज भरले आहेत; पण यापैकी किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले, याची यादी शासनाकडून अद्याप मिळाली नाही. त्यामुळे या शेतक-यांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. 

तालुक्यातील लाख खंडाळा येथील रावसाहेब भागाजी गायकवाड या एकमेव शेतक-याला दिवाळीच्या मुहूर्तावर पालकमंत्र्यांच्या हस्ते १६ हजार ३८० रुपयांचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका व सहायक निबंधक कार्यालयाकडे कर्जमाफी झालेल्या शेतºयांची ग्रीन लिस्ट शासनाकडून उपलब्ध न झाल्याने गावनिहाय कर्जमाफी झालेल्या पात्र शेतक-यांची संख्या, कर्जमाफीची एकूण रक्कम ही माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील १५ शाखे अंतर्गत बाकीदार व थकबाकीदार शेतक-यांची संख्या २३ हजार एवढी आहे. या शेतक-यांची संपूर्ण माहिती जिल्हा बँकेने शासनाच्या १६६ कॉलममध्ये भरून अपलोड केली आहे; पण यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत याची माहिती शासनाकडून मिळाली नसल्याचे जिल्हा बँकेचे लोन आॅफिसर उगले यांनी सांगितले. तालुक्यातील शेतक-यांची माहिती कर्जमाफी योजनेसाठी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ७७ हजार ९८४ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचे चावडीवाचन तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आले आहे; पण पात्र शेतक-यांची यादी उपलब्ध न झाल्याने बळीराजाला कर्जमाफीसाठी वाट बघावी लागत आहे.

साहेब पैसे केव्हा येणार....च्औरंगाबाद येथे १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील एकमेव शेतकरी रावसाहेब भागाजी गायकवाड या शेतक-याचा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सत्कार करून कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला; मात्र या शेतक-याच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत.

शासनाची यादी प्राप्त झाली नाही कर्जमाफी झालेल्या पात्र शेतक-यांची ग्रीन लिस्ट शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही. ही यादी मिळाल्यानंतर तालुका कर्जमाफी समितीतर्फे तपासणी करून वेबसाइटवर टाकण्यात येईल. एक-दोन दिवसांत ही यादी मिळण्याची अपेक्षा आहे. -एफ.बी. बहुरे, सहायक निबंधक