शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने रचला सराफ्याला लुटण्याचा प्लॅन; कर्मचाऱ्यामुळे कट उघड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:26 IST

दागिन्यांसाठी पुण्यावरून येताच पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन ॲपद्वारे ओळख झालेल्या मैत्रिणीच्या मदतीने एका एमबीए उत्तीर्ण तरुणाने शहरातील सराफा व्यावसायिकाचे दागिने लुटण्याचा कट रचला. त्यासाठी व्यावसायिकाच्याच कामगाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तरुणाला रविवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. राहुल निवृत्ती सकटे (३६, रा. पुणे) व ममता अनिल उलेमाले (रा. टिळक पथ) अशी आरोपींची नावे आहेत.

मधुबाला जिगनेश चंद्राणी यांचे कासारी बाजारात स्वामी नारायन ज्वेलर्स हे दालन आहे. त्यांच्या दालनात अमोल मैड, ममता उलामाले, मयूर टेरहे व शुभम साळवे काम करतात. २७ मार्चला अमोलला 'तुला पैशांची गरज आहे. मी तुला मदत करू शकतो. दुकानात काम करणाऱ्या सगळ्यांकडे पैसे आहेत. फक्त तुझ्याकडे नाही. जर तू दुकानातील दागिने काढून मला दिलेस, तर तुलाही पैसे मिळतील.' असा मेसेज प्राप्त झाला. अमोलने तो प्रामाणिकपणे चंद्राणी कुटुंबाला दाखवला तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे अमोल मेसेजला सकारात्मक रिप्लाय देत गेला. २१ एप्रिलला अमोलला मेसेज प्राप्त झाला. त्यात संबंधिताने अमोलला दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, तिजोरीतील पैसे, गहाण सोने बॅगमध्ये भरण्यास सांगितले.

चंद्राणी कुटुंबाने रचला सापळाचंद्राणी कुटुंबाने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला रंगेहात पकडण्याचे ठरवले. २२ एप्रिलला अमोलला दागिन्यांची बॅग घेण्यासाठी येत असल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यासाठी व्यावसायिकाने एका बॅगमध्ये बनावट दागिने भरले. ठरल्याप्रमाणे दालनाजवळच बॅग घेण्यासाठी संशयित येताच सर्वांनी मिळून त्याला पकडले. निरीक्षक संभाजी पवार यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक निवृत्ती गायके, अर्जुन कदम यांनी धाव घेत त्याला अटक केली. चौकशीत त्याचे राहुल सकटे नाव निष्पन्न झाले.

वीस वर्षांपासून कामाला तरीही-मूळचा सांगलीचा असलेला राहुल पुण्यात राहतो. मात्र, तो कर्जबाजारी झाला आहे. एका ऑनलाईन ॲपद्वारे त्याची चंद्राणी यांच्याकडे २० वर्षांपासून कामाला असलेल्या ममतासोबत ओळख झाली. त्या दोघांनी हा कट रचला होता.-जानेवारी, २०२५ मध्ये चंद्राणी यांच्या दुकानासमोर बंद लिफाफ्याद्वारे अज्ञाताने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती.-विशेष म्हणजे, राहुलने अमोलला मेसेज करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय ॲपवर पैसे खर्च करून आंतरराष्ट्रीय रचनेच्या संपर्क क्रमांकाचा वापर केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर