शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी - पिकअप अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:02 IST

दुचाकीवर समोर बसलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला

औरंगाबाद : औरंगाबाद येथील एका रुग्णालयातुन आपल्या मुलावर उपचार करून गावाकडे परत निघालेल्या दाम्पत्याची दुचाकी पिकअप वाहनाला पाठीमागुन जोरदार धडकली. यावेळी दुचाकीवर समोर बसलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज ( दि ४ रोजी ) दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंपळगाव पांढरी शिवारात घडली.

शेख अमान शेख शौकत ( ६,रा. रांजणगांव दांडगा ता पैठण ) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर शेख शौकत उर्फ कठठू शेख लाल ( २८ ) व शेख नसरीन शेख शौकत (२३)  हे दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.करमाड पोलिसांनी सांगितले की पैठण तालुक्यातील रांजणगांव दांडगा येथील दांपत्य आज सकाळी आपला मुलगा अमान हा आजारी असल्याने त्याला औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच्यावर उपचार करून परत दुपारी आडूळ मार्गे रांजणगांव दांडगा येथे आपल्या घरी हे पती पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघे जण दुचाकीवर ( क्रमांक एम एच २०,सी ई - ५३२२) परतत असतांना पिंपळगाव पांढरी शिवारात त्यांची दुचाकी औरंगाबादहुन आडूळकडे जात असलेल्या पिकअप वाहनाला ( एम एच २१,एक्स ५१२०) पाठीमागून जोरदार धडकली. यावेळी दुचाकीवर समोर बसलेला अमान जागीच ठार झाला. तर त्याचे आई - वडील गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या पत्नी पत्नीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

शेख अमान हा रांजणगांव दांडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ लिच्या वर्गात शिकत होता.त्याला दोन मोठ्या बहिणी असून आई वडिलांना तो एकुलता एक होता.त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या राष्ट्रीय महामार्गावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रांजणगांव दांडगा येथील ग्रामस्थांनी लावून धरल्याने याठिकाणी काही वेळापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातhighwayमहामार्ग