शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:47 AM

कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. बुधवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.मुन्ना केशव घोलप, कृष्णा उर्फ चिवळ्या कचरू खोड, विजय दिनकर जाधव, कृष्णा ठेंगू घोलप, संजय सुभाष घोलप (सर्व रा.वासनवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. बाळू हा मंगळवारी वासनवाडी येथे गवळीबाबा यात्रेनिमित्त गेला होता. याचवेळी तो कुस्त्याच्या फडाकडे गेला. बाळू हा कुस्त्याच्या फडाजवळ उभा असताना विजयने मागे सरक असे म्हणत त्याच्या पायावर काठीने मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण वाढले. बाजूलाच उभा असणाºया चौघांसह अनोळखी व्यक्तींनी बाळूला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. धनराज दळवी यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, कृष्णास त्याच्या सासरवाडी असलेल्या खापर पांगरी येथून पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच संजय खोड याच्याही वासनवाडीतून मुसक्या आवळण्यात आल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेऊ, असे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनीसांगितले.