शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत गंभीर जखमी पती -पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:27 IST

वेरूळ येथील आखातवाडा फाटा येथील घटना

खुलताबाद:  दुचाकीस्वारास कारने मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पती- पत्नीचा शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास सोलापूर- धुळे मार्गावरील वेरूळ नजीक आखात वाडाफाटा येथे घडला. 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील भागीनाथ दगडू आधाने ( 50 ) व त्यांची पत्नी कासाबाई ( 42)   हे मोटारसायकलवर (एम.एच. 20 डी.एस. 5949 ) चिंचोली येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी सुलतानपूरला येत परतत होते. यावेळी  कन्नडहून औरंगाबादकडे येत असलेल्या एका कारने (एम.एच.20 ई.वाय. 7161) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. भागीनाथ यांचा उपचारादरम्यान गुरूवारी रात्री उशिरा मृत्यू झाला तर कासाबाई भागीनाथ आधाने यांचा आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

याप्रकरणी रंगनाथ पंढरीनाथ चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरून कारचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार झरेकर हे करीत आहेत. पती- पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई व दोन मुले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद