शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी पकडल्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतलेल्या विद्यार्थ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 11:59 IST

शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. १० ) परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देसचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले.

औरंगाबाद : शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने मंगळवारी (दि. १० ) परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.   

काय आहे प्रकरण :हर्सूल येथे राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सध्या सचिनच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरु आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षकाने त्याला पुढील कारवाईसाठी प्राचार्याकडे नेले. 

कारवाईने खचला अन् मारली उडीकॉपी सापडल्याने महाविद्यालयाने केलेल्या कारवाईमुळे घरच्या मंडळींना कसे सामोरे जावे या द्वंद्वात अडकलेल्या सचिनने काही मिनिटांत महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यातील काचेचे तावदान हटवून त्यातून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने एमआयटीतच शिक्षण घेत असलेला मित्र सौरभ रणदिवे याला मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु सौरभचीही परीक्षा चालू असल्याने त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सचिनने घराजवळील मित्र शुभम राठोडला फोन करून, तो आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. 

पहा व्हिडिओ : विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

सचिन व शुभम या दोन्ही मित्रांचे वारंवार फोन येत असल्याने सौरभने फोन उचलला अन् पेपर अर्ध्यावर सोडून त्याच्या कॉलेजच्या दिशेने धाव घेतली. समोरचे चित्र पाहून सौरभ थबकला.  महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून सचिन खिडकीतून उडी मारण्याच्या तयारीत होता. ‘नको नको असे नको करू नकोस,’ आरडाओरड सुरू होता. जिन्याने पळत जाऊन त्याला रोखेपर्यंत त्याने उडी मारली होती. सौरभने अन्य मित्रांच्या मदतीने त्वरित दवाखान्यात दाखल केले. येथेच उपचारांदरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. 

शांत व हुशार विद्यार्थी...सचिनचे वडील बस कंडक्टर असून, ते पुणे येथे नोकरीला आहेत. नवनाथनगरात मोठी बहीण,भाऊ, आई राहतात. दडपणामुळेच हा प्रकार त्याने केला असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMIT Aurangabadएमआयटी औरंगाबादTeacherशिक्षक