शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कुरिअरने आलेली प्राणघातक शस्त्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:14 IST

शहरात बिनबोभाटपणे तलवारी, चाकू, कुकरी आणि गुप्ती अशी घातक शस्त्रे आणणाऱ्या दोन कुरिअर कंपन्यांवर छापे मारून गुन्हे शाखेने सोमवारी रात्री २८ शस्त्रे जप्त केली.

ठळक मुद्देजयभवानीनगर, नागेश्वरवाडीत एजन्सीवर छापे : तलवारी, जंबिया, चाकू, गुप्ती अशी ३१ शस्त्रे गुन्हे शाखेने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात बिनबोभाटपणे तलवारी, चाकू, कुकरी आणि गुप्ती अशी घातक शस्त्रे आणणाऱ्या दोन कुरिअर कंपन्यांवर छापे मारून गुन्हे शाखेने सोमवारी रात्री २८ शस्त्रे जप्त केली. आॅनलाईन वस्तू विक्री करणाºया काही कंपन्यांकडून खेळणी विकण्याच्या नावाखाली खरीखुरी शस्त्रे पॅकिंग करून शहरात पुरविण्याचा धंदा काही दिवसांपासून सुरू होता. याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात दोन कुरिअर कंपन्यांच्या व्यवस्थापकांसह पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील आणखी काही जणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मावळते आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकारांना दिली.पोलिसांंना जयभवानीनगर आणि नागेश्वरवाडीतील दोन कुरिअर एजन्सींमध्ये शस्त्रे मागविण्यात आल्याची माहिती मिळाली. फ्लिपकार्ट व को मार्केटिंग इन्स्टाकार्ट पार्सलमध्ये ही शस्त्रे आल्याची माहिती होती. सोमवारी रात्री गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, योगेश धोंडे, फौजदार अनिल वाघ, नंदकुमार भंडारी, सहायक फौजदार महाडिक यांच्या पथकाने जयभवानीनगर व नागेश्वरवाडीत छापा मारला. या एजन्सीमधील कुरिअरने आलेले पार्सल तपासल्यानंतर तिथे तलवारी, चाकू, कुकरी आदी धारदार शस्त्रे मिळाली.जयभवानीनगर येथील एजन्सीमध्ये आठ पार्सलमधून शस्त्रे आल्याचे आढळले. ८ तलवारी, एक मोठा चाकू आणि एक कुकरी मिळाली, तर नागेश्वरवाडी येथील एनज्सीमध्ये ४ तलवारी, दोन गुप्ती आणि १५ चाकू व जंबिया सापडले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मिळून ३१ शस्त्रे जप्त केली आहेत. ही सर्व शस्त्रे प्राणघातक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.कुरिअर एजन्सीमध्ये शस्त्रे कशी आली, याचा पोलिसांनी शोध घेतला असता शहरातील अनेक महाभागांनी ही शस्त्रे आॅनलाईन मागविली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आॅनलाईन शस्त्रे मागविणाºया ग्राहकांचे आणि आॅनलाईन विक्री करणाºया कंपन्या तसेच कुरिअर एजन्सीचे रेकॉर्ड तपासले असता शहरातील अनेक नागरिकांनी ही शस्त्रे आॅनलाईन खरेदी केली असल्याचे समोर आले आहे.गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहेपोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाटगे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.कुणी गुन्हेगारी कारवाईत खतपाणी घालत असेल, तर त्यांची गैर केली जाणार नाही.लिस्टनुसार प्रत्येकाचे गुन्हेगारी रेकार्ड तपासणार आहोत. दोन्ही ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, योगेश धोंडे, फौजदार अनिल वाघ, नंदकुमार भंडारी, महाडिक यांच्यासह पोकॉ. सुभाष शेवाळे, संतोष सोनवणे, नितीन मोरे, संजय धुमाळ, सतीश हंबर्डे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, हकीम पटेल,भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंके, सय्यद अशरफ, नवाब शेख, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, विकास गायकवाड, मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, बनकर, शिवा बोर्डे, शेख बाबर, प्रभाकर राऊत, देवचंद मेहर, विलास वाघ, गजानन मांटग यांच्या पथकांनी छापा टाकून साठा पकडला आहे.अटकेतील आरोपीफ्लिपकार्ट व को-मार्केटिंग इन्स्टाकार्ट सर्व्हिसेसच्या एजन्सीचा व्यवस्थापक स्वप्नील अशोकराव दहिवाळकर (३२, एन-१२ ), तसेच व्यवस्थापक अजितकुमार प्रकाश गंगवाल, नावीद खान उबेद खान (२४, रा. उस्मानपुरा), चंदन (चंदू) आनंद लाखोलकर (२२, न्यू. एस.टी. कॉलनी, मुकुंदवाडी), मुकेशा भगवान पाचवणे (२२, रा. लहुजीनगर), सागर बन्सीलाल पाडसवान (२१, रा. न्यू हनुमाननगर), जुबेर शहा दिलावर शहा (१९, रा. पोटूळ, ह.मु. साजापूर) विकास महादू दळवे (२०, रा.विजयनगर, नक्षत्रवाडी), असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, क्रांतीचौक पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सखोल चौकशी करणार -भारंबेशहरात नुकतीच दंगल झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही शस्त्रे शहरात सापडली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. दंगलीचे पडसाद पुन्हा उमटू नयेत, याची काळजी घेतली जाईल. शहरात आणखी किती कुरिअर एजन्सीमध्ये आॅनलाईन शस्त्रे मागविण्यात आली आहेत, याची सखोल चौकशी केली जाईल.-मिलिंद भारंबे, प्रभारी पोलीस आयुक्तखरेदीदार, मार्केटिंग, डिलिव्हरी करणाºयांवर गुन्हेज्या ग्राहकांनी आॅनलाईन शस्त्रे खरेदी केली आहेत त्यांच्यावर तसेच शस्त्रांचे पार्सल पाठविणाºया कंपन्या आणि त्यांना मदत करणाºया एजन्सीचे मालक व डिलिव्हरी करणाºया मुलांविरुद्ध क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी शस्त्रे मागविली आहेत त्यांच्यासह एजन्सीमध्ये काम करणाºयांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचाही गुन्हे शाखेचे पथक तपास करणार आहे. ही शस्त्रे कोणी व कशासाठी मागविली यादृष्टीने पोलिसांचा तपास राहणार आहे.