शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ विशेष रेल्वेच सुरू; पॅसेंजर गाड्या बंद असल्याने रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 19:26 IST

closure of passenger trains from Aurangabad कोरोनापूर्वी पॅसेंजर असलेली औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ही रेल्वे आता एक्स्प्रेस म्हणून धावत आहे.

ठळक मुद्देग्रामीण, गोरगरीब प्रवाशांची गैरसोयसचखंड, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेस सुरू

औरंगाबाद : औरंगाबादहून नांदेड मनमाड किंवा सिकंदराबाद किंवा अन्य ठिकाणासाठी सध्या एकही पॅसेंजर रेल्वे धावत नाही. सध्या ज्या विशेष रेल्वे धावत आहेत, त्या सर्वच एक्स्प्रेस आहेत. त्यातही आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवेश दिला जातो. पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पैसे वाचविण्यासाठी रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवास करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. 

कोरोनामुळे रेल्वेची वाहतूक बंद केली होती. जूनपासून सचखंड एक्स्प्रेस सुरु झाली आणि त्यानंतर विशेष रेल्वे म्हणून अन्य ७ रेल्वेही सुरू करण्यात आल्या.  रोटेगाव, तारूर, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, बदनापूर, जालना आदी ठिकाणांहून औरंगाबादला रोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु पॅसेंजरच नसल्याने या प्रवाशांची गैरसोय होत आहे. गरीबांच्या सोयीची रेल्वे सुरु करण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारही फारसे गंभीर नसल्याचे दिसत आहे. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने गरीबांना मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. हिवाळ्याच्या दिवसात कडाक्याची थंडी असताना अनेकजण लांबच्या पल्ल्याचा प्रवासही दुचाकीवर करत असल्याचे चित्र दिसते. 

नगरसोल-नांदेड  पॅसेंजर बंदनगरसोल-नांदेड पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू, निजामाबाद-पुणे, पुणे- निजामाबाद,  दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा, काचीगुडा-मनमाड या पॅसेंजर सध्या बंद आहेत. यात निजामाबाद-पुणे,दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा जेव्हा सुरू होतील, तेव्हा एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम राहण्याची स्थिती आहे.

रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवासरोज नोकरी, व्यवसाय, काम, शिक्षण, उपचारासाठी ये-जा करणाऱ्यांना रस्तेमार्गाने ये-जा करावी लागत आहे. पैसे वाचविण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सिट प्रवास केला जातो. प्रवाशांची ही जीवघेणी कसरत थांबण्यासाठी पॅसेंजर सुरू होणे गरजेचे आहे.-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष रेल्वे प्रवासी सेना

सचखंड, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेस सुरूऔरंगाबादहून सध्या सचखंड, देवगिरी, नंदीग्राम, राज्यराणी, अजिंठा एक्स्प्रेस, नरसापूर-नगरसोल, काकीनाडा- शिर्डी एक्स्प्रेस धावत आहे. तसेच कोरोनापूर्वी पॅसेंजर असलेली औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ही रेल्वे आता एक्स्प्रेस म्हणून धावत आहे.

प्रवाशांची होतेय परवडलासूरहून औरंगाबादला पॅसेंजरने येण्यासाठी केवळ १० रुपये लागतात. परंतु, पॅसेंजरच बंद असल्याने एसटीने, दुचाकीने ये-जा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यासाठी ६० ते ७० रुपये खर्च होतात. यातून गोरगरीब प्रवाशांची परवड होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद