शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात

By संतोष हिरेमठ | Updated: December 14, 2024 17:17 IST

‘ती’ बहुतांश औषधी संपल्याचा आता दावा : मोजकेच औषधी नमुने तपासणीला

छत्रपती संभाजीनगर : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ प्रकारची औषधी पुरवठा केल्याचे ४ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र, आता यातील ४९ प्रकारची औषधी संपल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट औषधींचा प्रकार, त्यानंतर संबंधित एजन्सीने शहरात पुरवठा केल्याचे समोर येणे आणि तपासणीसाठी नमुने घेण्याच्या अवघ्या ४ दिवसांत औषधी संपल्याचेही सांगण्यात येत असल्याने ‘कुछ तो गडबड है दया’ अशी चर्चा आहे.

मे. विशाल एंटरप्रायजेसने छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल ३३ प्रकारची आणि जिल्हा रुग्णालयाला २५ प्रकारची औषधी पुरवठा केल्याचे उघडकीस आले. राज्यभरात बनावट औषधींचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने (औषध) बुधवारपासून सरकारी रुग्णालयांतून तपासणीसाठी औषधी नमुने घेण्यास सुरुवात केली. घाटी रुग्णालयातून ५ आणि जिल्हा रुग्णालयातून ३ नमुन्यांची तपासणी झाली. जिल्हा रुग्णालयातील ३ पैकी २ औषधी नमुने हे मे. विशाल इंटरप्रायजेसने पुरवठा केलेली आहे. या ८ औषधी नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

घाटीत २६ प्रकारची औषधी संपलीमे. विशाल एंटरप्रायजेसने छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल ३३ प्रकारच्या औषधींचा पुरवठा केल्याचे १० डिसेंबर रोजी उघडकीस आले. या औषधींचा वापर तत्काळ थांबविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. आता ४ दिवसांनंतर यातील २६ प्रकारची औषधी संपल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. उर्वरित ७ प्रकारची औषधीही केवळ महिनाभर पुरतील, इतकीच असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात २ प्रकारचीच उरली औषधीजिल्हा सामान्य रुग्णालयात मे. विशाल एंटरप्रायजेसने मार्च २०२३ मध्ये २५ प्रकारची औषधी आणि १६ प्रकारचे सर्जिकल साहित्य पुरवले. या २५ पैकी २३ प्रकारची औषधी आता संपल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या केवळ मधुमेह आणि पोटदुखीच्या जवळपास ३५ हजार गोळ्या शिल्लक आहेत.

१२ लाख गोळ्या संपल्यामे. विशाल एंटरप्रायजेसने पुरविलेली दोन प्रकारच्या १२ लाखांवर गोळ्या आता संपलेल्या आहेत, असे सांगण्यात येत आहे. अन्य प्रकारच्या औषधी गोळ्यांचीही संख्या अधिक आहे, जी आता संपलेली आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यmedicineऔषधं