शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस अगोदरच पेपर झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रंथालयशास्त्र विभागात विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर एक तारीख, तर वेळापत्रकात दुसरीच तारीख दर्शविल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले़

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रंथालयशास्त्र विभागात विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर एक तारीख, तर वेळापत्रकात दुसरीच तारीख दर्शविल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले़विद्यापीठातील ग्रंथालयशास्त्र विभागाच्या ‘इन्फॉर्मेशन सोर्सेस अ‍ॅण्ड सर्व्हिसेस-३’ विषयाचा पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकात २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे वेबसाईटवर दर्शविण्यात आले होते; परंतु दहा ते बारा दिवसांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉलतिकिटावर याच पेपरची तारीख २७ एप्रिल देण्यात आली़ २७ एप्रिलला पेपर असल्याचे समजून विद्यार्थ्यांनी तयारी केली; परंतु विद्यापीठाने ही परीक्षा २६ एप्रिलला उरकून घेतली़ हॉलतिकिटावरील तारखेप्रमाणे विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला़ एक दिवस अगोदरच परीक्षा झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले़ विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे अनेक विद्यार्थी या पेपरच्या परीक्षेपासून वंचित राहिले़ दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर कडक कार्यवाही करून सदरच्या पेपरची नव्याने परीक्षा घेण्याची मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने केली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद