शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड - नांदेड पॅसेंजर कधी धावणार ? एक्स्प्रेस, डेमू रेल्वेतून प्रवास करताना खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 18:39 IST

पॅसेंजरअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद :कोरोना प्रादुर्भावात काही पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलल्या, तर काही डेमू रेल्वे म्हणून धावत आहे. नियमित एक्स्प्रेसही आता सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनही दौंड - नांदेड पॅसेंजरसह अन्य काही पॅसेंजर सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. परंतु पॅसेंजरअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नगरसोल - काचिगुडा पॅसेंजर, दौंड - नांदेड पॅसेंजर, जालना - नगरसोल डेमू या रेल्वे कधी सुरु होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, काचिगुडा- रोटेगाव डेमू रेल्वे ही नगरसोलपर्यंत नेली पाहिजे. त्यातून प्रवाशांची सोय होईल.

पॅसेंजर झाली एक्स्प्रेसऔरंगाबाद-हैदराबादर ही पॅसेंजर आता एक्स्प्रेसमधून धावत आहे. त्याबरोबर निजामाबाद-पुणे, काचिगुडा-रोटेगाव, नांदेड - मनमाड डेमू रेल्वे धावत आहे. पॅसेंजरच्या तुलनेत डेमू रेल्वेसाठी अधिक भाडे असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.

जनरल तिकिट बंदचरेल्वेचा स्पेशल दर्जा काढून आता पूर्वीप्रमाणे नियमित रेल्वेगाड्या धावत आहेत. परंतु अजूनही जनरल तिकीट विक्री बंदच असल्याने मराठवाडा, तपोवन, नंद्रीग्राम, देवगिरीसह अन्य काही एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांतून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासच करता येत नाही. याविषयी प्रवाशांतून ओरड होत आहे.

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस :जनशताब्दी एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, अजिंठा एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस

पॅसेंजर सुरु कराप्रवाशांच्या सुविधेसाठी पूर्वीप्रमाणे पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याची गरज आहे. डेमू आणि एक्स्प्रेस रेल्वेतून प्रवास करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. सर्वसमान्यांना हे परवडणारे नाही.- सुर्यकांत गायके, प्रवासी

इतर ठिकाणी सुरुमुंबईत लोकल रेल्वे धावत आहेत. इतर विभागांमध्येही पॅसेंजर धावत आहे. आपल्याकडे मात्र, पॅसेंजर सुरु केल्या जात नसल्याचे समजते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- अभिजित कुलकर्णी, प्रवासी

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबाद