शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंटमधील लेझर लाइट पायलटच्या डोळ्यांत गेल्याने काहीकाळ अंधारी; फुगे, राॅकेटनेही धोका

By संतोष हिरेमठ | Updated: July 15, 2023 15:48 IST

विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर; धावपट्टीच्या साडेनऊ कि. मी. परिसरातील लाॅन्स, व्यावसायिक, मालमत्ताधारकांना नोटीस

छत्रपती संभाजीनगर : लग्नसोहळा, समारंभ आणि वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये लेझर लाइट, फुगे सोडणे, आतषबाजीसाठी राॅकेट उडविण्याचा प्रकार होतो. या अशाच प्रकारामुळे काही काळापूर्वी चिकलठाणा विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटच्या डोळ्यात लेझर लाइट जाऊन काही वेळेसाठी डोळ्यापुढे अंधार आल्याचा प्रकारही घडला. त्यातून अपघाताचा धोका असल्याने या कारणाने विमान प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, धावपट्टीच्या साडेनऊ कि. मी. परिसरातील लाॅन, विविध व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांना याविषयी नोटीस बजावण्यात येत आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूने शहर आहे. विमानतळापासून काही अंतरावरच इमारतींवर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठे फुगे लावण्यात येत आहेत. आतषबाजीसाठी दिवाळीत उडविण्यात येणारी राॅकेट आता कधीही उडविण्याचा प्रकार होत आहे. तर छायाचित्र, व्हिडीओ आणि रिल्ससाठी ड्रोन उडविण्याचा प्रकार होत आहे. ही बाब विमानतळ प्राधिकरणाकडून गांभीर्याने घेत परिसरातील मालमत्ताधारकांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात येत आहेत. विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेता या बाबी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

किती किमी परिसर लेझर बीम फ्री फाइट झोन? चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्व ते पश्चिम दिशेला साडेनऊ कि. मी. आणि धावपट्टीच्या उत्तर ते दक्षिण दिशेला साडेतीन कि. मी. परिसर लेझर बीम फ्री फाइट झोन करण्यात आला आहे.

परवानगी आवश्यक विमानांची, प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची ‘एटीसी’चे सहायक व्यवस्थापक राहुल साहू म्हणाले, अनेक इव्हेंटमध्ये लेझर लाइटचा वापर केला जातो. हा लेझर लाइट एका वैमानिकाच्या डोळ्यात जाण्याचा आणि त्यातून काही वेळासाठी वैमानिकाला अंधत्व येण्याचा प्रकार यापूर्वी आपल्याकडे झाला आहे. त्यामुळे लेझर लाइटचा वापर करताना परवानगी घेणे आवश्यक आहे.

परवानगी घ्यावीझाल्टा, सुंदरवाडी ते गारखेडा परिसरापर्यंत विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत लेझर लाइट, राॅकेटसारखे फटाके, फुग्यांचा वापर विनापरवानगी करता कामा नये. त्यासाठी विमानतळावरील ‘एटीसी’ची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी वापर केल्यास कारवाई केली जाईल. विमानांची ये-जा करण्याची वेळ सोडून इतर वेळेत या बाबींसाठी परवानगी दिली जाते.- विनायक कटके, सहायक महाव्यवस्थापक, एटीसी

विमानतळावरून रोज टेक ऑफ घेणारी विमाने - ८विमानतळावर दररोज उतरणारी विमाने - ८ 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटनAccidentअपघात