शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर भलतेच धाडस; हातात पिस्तूल घेऊन गावगुंडांनी बनवले रील्स

By सुमित डोळे | Updated: July 16, 2024 19:53 IST

जिन्सीतील पाच गावगुंडांना इन्स्टाग्राम रील नडले, घेऊन गेले थेट तुरुंगात

छत्रपती संभाजीनगर : डोक्यात भाईगिरीची हवा, दोघांच्या हातात पिस्तूल, मागे सोबतचे दहा ते बारा टवाळखोर अन् बॅकग्राऊंडला धमक्यांचे बोल असलले गाणे... सुसाट वाहने वाहणाऱ्या समृध्दी महामार्गावर वाहने उभी करून १६ टवाळखोरांनी असे रील तयार केले. मात्र, पोलिसांपर्यंत हे रील पोहोचले. बारा तासांमध्ये पिस्तुलाऐवजी हातात बेड्या पडून पाच जणांची तुरूंगात रवानगी झाली. मंगळवारी गुन्हे शाखेने जिन्सी भागात ही कारवाई केली.

शेख हमीद शेख हबीब, शेख अफताब शेख कादर, शेख आशपाक शेख कादर (तिघेही रा. रेंगटीपुरा, जिन्सी), आदिल तंबोली ऐजाज (रा. तेलंग वस्ती, जिन्सी) व सुमित सुभाष अवलकर (रा. संजयनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी हमीद व अन्य आरोपींचे हे रील पोलिसांपर्यंत पोहोचले. उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी तातडीने अटकेच्या सूचना केल्या. निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी गुप्तपणे रीलमधील टवाळखोरांची माहिती मिळवली. त्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजेनंतर त्यांच्या घरी छापे टाकण्यात आले. अंमलदार परभत म्हस्के, विजय भानुसे, मनोहर गिते, संतोष भानुसे, ज्ञानेश्वर पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.

आधी पिस्तूल लपवलेरील पोलिसांपर्यंत पोहोचल्याची बाब हमीदला कळाली होती. त्यामुळे दोघांच्या हातातील दोन्ही पिस्तुले त्याने आधीच गायब केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पिस्तुलासह त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे दौलताबादचे उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी सांगितले.

रस्त्यावर दुचाकी उभ्या केल्याहमीद, अफताबसह एकूण १६ जणांनी मिळून समृध्दी महामार्गावर हे रील तयार केले. यात रस्त्याच्या मधोमध मोपेड दुचाकी उभ्या करुन रस्ता व्यापून ते गाण्याच्या तालावर चालत आहेत. यातील हबीबवर सिटी चौक, क्रांती चौक व सिडको ठाण्यात मारहाणीचे ३ तर हमीदवर दौलताबादमध्ये एक गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद