शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:01 IST

मराठवाड्यातील १२ पैक्की ७ आमदार शिंदे सोबत; ५०० कोटींहून अधिक कामे दिल्याने सगळेच समर्थक

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेवर निवडून गेलेल्या सगळ्या आमदारांना गडगंज निधी देऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपलेसे केले. त्या विकासनिधीची परतफेड म्हणून जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शिंदे यांना समर्थन देत पक्षनिष्ठेला तडा दिला. ५०० कोटींहून अधिकचा निधी सहा मतदारसंघात त्यांनी दिला. मराठवाड्यातील शिवसेनेच्या १२ पैकी ७ आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिल्याचे चित्र सध्या आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५, उस्मानाबादमधील १ आणि नांदेड जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल, पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट हे मंगळवारी सकाळपासून ‘नॉट रिचेबल‘ आहेत. यातील कितीजण मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. शिंदे यांनी सिल्लोड मतदारसंघात २०० कोटींहून अधिकचा निधी विकासकामांसाठी दिला. कन्नड मतदारसंघात ५०, तर वैजापूरमध्ये २५ कोटींहून अधिकचा निधी विविध कामांसाठी दिला. विशेष म्हणजे या कामांच्या उद्घाटनासाठी शिंदे हे हेलिकाॅप्टरने आले होते. पश्चिम मतदारसंघात ६० कोटींहून अधिकची कामे शिंदे यांनी दिलेल्या विकास निधीतून झालेली आहेत. याशिवाय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना १० कोटींच्या आसपास निधी दिला. मध्य मतदारसंघासह विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनाही ५० कोटींच्या आसपास निधी दिल्याचे बोलले जात आहे. पैठण मतदारसंघातही काही कामे शिंदे यांच्या निधीतून झाली.

काही काळ पालकमंत्री राहिले शिंदेएकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काही काळ होते. डॉ. दीपक सांवत यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ संपल्यानंतर शिंदे यांच्यावर प्रभारी पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या काळातही त्यांनी जिल्हा परिषदेतील रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावला होता. त्यावरून डीपीसीच्या बैठकीत वाद झाला होता. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत शिंदे पालकमंत्री होते. त्याचकाळात शिवसेनेतील अनेकांची शिंदे यांच्याशी सलगी वाढली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ