शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत कोसळली दरड; कुठलीही हानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 18:17 IST

Rain In Aurangabad : मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठालेणी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

सोयगाव ( औरंगाबाद ) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत ( Ajintha Caves ) दरड कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. बुधवार (दि.१८) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने लेणी क्रमांक ७ समोर कोसळलेले दगड बाजूला काढले. या संपूर्ण घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून आले. सुदैवाने दरड कोसळण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  ( Darad collapsed in the world famous Ajanta Caves; No harm done )

अजिंठा लेणी डोंगराच्या मध्यभागी कोरलेली आहे. परिणामी, पावसाळ्यात  डोंगरमाथ्यावरील मुरुम व मोठमोठे दगड ठिसूळ होऊन लहानमोठ्या दरडी थेट अजिंठालेणीत कोसळण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून अशा घटनांबाबत नेहमीच कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याचे आढळून येते. दरम्यान, विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी (दि.१७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठालेणी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरु झालेला हा पाऊस सुमारे तीन ते चार तास बरसला. या सततधार पावसामुळे अजिंठालेणी डोंगर माथ्यावरील एक दरड ठिसूळ होवून रात्री उशिरा अजिंठालेणीत कोसळली. या दरडीतील काही दगड लेणी क्रमांक- ७ समोरील रस्त्यावर कोसळल्या. त्यापुढील लेण्यांकडे जाणारा मार्ग बंद झाला. बुधवारी (दि.१८) सकाळी ही घटना उघडकीस आली. भारतीय पुरातत्त्व विभागाने अत्यंत तत्परतेने दगड बाजूला काढून पर्यटकांना अजिंठालेणी बघण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. 

दरड कोसळण्यावर उपाययोजना हव्यात ११ जून २०२० मध्ये दरड कोसळून लेणी क्रमांक २० व २१ या दोन लेण्यांना जोडणारा पुल तुटला होता. सुदैवाने त्यावेळी ही दरड रात्रीच्या वेळी कोसळल्याने व लॉकडाऊनमुळे लेणी बंद असल्याने जिवीतहानी झाली नव्हती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवारी (दि.१७) च्या रात्री लेणी क्रमांक ७ समोर दरड कोसळण्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत ही कोणतीही जीवितहानी झाली नसलीतरी या घटनेवरुन अजिंठालेणीत दरडीत कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना रोखण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाला सतत अपयश येतांना दिसत आहे. ही बाब जागतिक वारसास्थळ असलेल्या लेणीच्या जतन,संरक्षण व संवर्धानाच्या दृष्टीने घातक ठरु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन