शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर दिरंगाई ! पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा साचला ढीग ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 16:26 IST

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना अद्याप एक छदामही विमा कंपन्यांनी दिलेला नाही.

ठळक मुद्देमराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाचे कडक भाषेत पत्र आल्याचे वृत्तमराठवाड्यात खरीप हंगामातील ३७ लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. विभागातील बाधित ४७ लाखपैकी सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे प्रमाण

औरंगाबाद : मराठवाड्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींचा ढीग जिल्हाधिकाऱ्यांच्या दप्तरी साचला आहे. जिल्हा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कृषी आयुक्तालयाने कडक भाषेत पत्र देऊन त्याचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे वृत्त आहे.

राज्य शासनाने एसडीआरएफमधून (राज्य आपत्ती मदत निधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी सुमारे ३७०० कोटी रुपयांची मदत केली असली तरी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना अद्याप एक छदामही विमा कंपन्यांनी दिलेला नाही.पीकविमा कंपन्यांच्या हरकतींवर अद्याप जालना, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यांसह विभागातील इतर जिल्ह्यांचाही यात समावेश असल्याचे कळते. मराठवाड्यात खरीप हंगामातील ३७ लाख हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. विभागातील बाधित ४७ लाखपैकी सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याचे प्रमाण आहे. पीकविमा, शेतकरी, राज्य व केंद्र शासन वाटा याची एकंदरीत माहिती अजून गोळा करण्याचे काम महसूल प्रशासन करीत आहे.

एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राला २५८५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट येणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे विम्याच्या यादीतील पिकांसाठी अधिसूचना काढावी लागते. काही जिल्ह्यांत या अधिसूचना निघाल्या आहेत. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत या अधिसूचना निघालेल्या नाहीत. विमा कंपन्या नफेखोर आहेत. त्यामुळे कंपन्या हरकती दाखल करण्याचे धोरण मागील काही वर्षांपासून घेत आहेत. त्यामुळे भरपाईची प्रक्रिया लांबणीवर पडते. या सगळ्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी हरकती निकाली काढणे गरजेचे असते. ही प्रक्रिया वेळेत झाली नाही तर शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत मिळत नाही.

...तरच लवकर मिळेल विम्याची रक्कमपिकांच्या नुकसानीनंतर विमा कंपन्यांच्या हरकतींवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. कंपन्यांच्या हरकती निकाली न निघाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकती निकाली निघाल्यास भरपाईची अधिसूचना निघेल, विमा कंपन्यांना हा प्रकार मान्य नसल्याचे कळते. हरकतींचा लवकर निपटारा झाल्यास शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा