शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छतेविषयी झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:43 PM

मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल हा ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आरसा ठरायला हवा; परंतु येथील त्यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करताना मैदानावर धूळ उडून त्रास होऊ नये यासाठी त्यावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर आठवड्यातून एकदा करण्याच्या सूचना विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व सहसचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांना केल्या आहेत.

ठळक मुद्देक्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी मैदानावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर करण्याच्या दिल्या सूचना

औरंगाबाद : मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल हा ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आरसा ठरायला हवा; परंतु येथील त्यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करताना मैदानावर धूळ उडून त्रास होऊ नये यासाठी त्यावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर आठवड्यातून एकदा करण्याच्या सूचना विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व सहसचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांना केल्या आहेत.विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छता आणि गैरसोयींविषयी अनेक तक्रारी होत आहेत. त्याचे औचित्य साधताना पुणे येथील मुख्यालयातर्फे क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांना विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आलेहोते.यावेळी सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुलातील पूर्ण परिसराशिवाय, इनडोअर हॉल, अ‍ॅथलेटिक्सचे मैदान, हॉकी, क्रीडा प्रबोधिनी तसेच खेळाडूंच्या पिण्यासाठीच्या टाकीचीदेखील स्वत: टाकीवर उभा राहून पाहणी केली. यावेळी त्यांना कचऱ्याचे ढिगारे दिसले. त्याचप्रमाणे पावसाळ्यात अ‍ॅथलेटिक्स व फुटबॉल मैदानातील ड्रेनेजमधील अर्धवट काढलेली माती तेथेच टाकल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. इनडोअर हॉलमध्ये १२ बॅडमिंटनचे कोर्ट आहेत. इनडोअर हॉल हा मल्टीपर्पज हॉल आहे आणि बॅडमिंटन कोर्टसाठी जास्त जागा आहे त्याचे नियोजन करून अन्य खेळही तेथे घेतले जाऊ शकतील, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. विभागीय क्रीडा संकुलात मुख्य पिण्याच्या पाण्याच्या टाकीची क्षमता ही दीडलाख लिटर असून, २० हजारांच्या प्रत्येकी २ टाक्या आहेत. या पाण्याचे आॅडिट करून त्याचा योग्य वापर व्हायला हवा. आरोग्यासाठी अ‍ॅथेटिक्स मैदानावर धावण्याचा सराव करणाºया खेळाडू आणि नागरिकांना त्रास होत आहे. हे लक्षात घेऊन पिण्यास अयोग्य पाण्याचे टँकर आठवड्यातून एकदा बोलावण्यात यावे, असे त्यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना बजावले.विभागीय क्रीडा संकुलाच्या नाल्यांमधील मातीचीही विल्हेवाट पावसाळा झाल्यानंतरही करण्यात आलेली नाही. ही माती अ‍ॅथलेटिक्स मैदानावरील अर्दंड माऊंटवर टाकावी ज्यायोगे नागिरक तेथे फिटनेस करू शकतील व स्वच्छताही राखली जाईल. टेनिस केंद्राच्या मागे कचरा आहे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करावा ज्यायोगे तेथे स्वच्छता राखली जाईल, असे त्यांनी सांगितले. हॉकी मैदानावर क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे हॉकीपटूंसाठी हॉकीचे मैदान पूर्णपणे खुले करून क्रिकेट या खेळासाठी दुसºया ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले.