शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक भाग उतरविला

By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST

भोकरदन : शहरातील ऐतिहासिक असलेल्या लाल गढीचा काही भाग धोकादायक झाल्यामुळे नगर परिषदेच्या वतीने हा भाग उतरविण्यात आला. मात्र तरीही या गढीचा काही भाग कमी करणे

भोकरदन : शहरातील ऐतिहासिक असलेल्या लाल गढीचा काही भाग धोकादायक झाल्यामुळे नगर परिषदेच्या वतीने हा भाग उतरविण्यात आला. मात्र तरीही या गढीचा काही भाग कमी करणे आवश्यक असल्याचे मत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे़पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटने नंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रफीक सय्यद यांनी शहरातील २०० वर्षाची पंरपरा लाभलेली ऐतिहासिक लालगढीच्या मालकांना गढी उतरविण्या संदर्भात नोटीसा दिल्या होत्या. मात्र या नागरिकांनी स्वत: गढी उतरविणे शक्य नाही, असे सांगितले. त्यानंतर या गढीवर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. तेव्हा नागरिकांनी गढी उतरविण्यास सहमती दर्शवली होती. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गढीचा धोकादायक भाग उतरविला आहे. मात्र अद्यापही काही भाग उतरविणे आवश्यक आहे. कारण काही ठिकाणी मध्ये बोगदे पडले असून विटा जीर्ण झाल्याचे दिसत आहे. जर दुदैवाने जास्त पाऊस झाला व गढी कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी घेणे आवश्यक आहे. या गढीच्या बाजूला नागरिक राहतात. तसेच गढी शेजारच्या रस्त्याने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे गढीवर वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा गढी कोसळल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे़ या गढीवर अ‍ॅड. लक्ष्मीकांत देशपांडे, सुरेशराव देशपांडे, पद्यीमन देशपांडे, दिलीप देशपांडे, संतोष अन्नदाते, अशोक अन्नदाते, नंदकुमार देशपांडे यांच्यासह काही नागरिकांचे वास्तव्य आहे. ही गढी देशपांडे कुटुंबाच्या मालकीची असून दोनशे वर्षापूर्वी त्यांच्या पुर्वजांनी या गढीचे बांधकाम केलेले होते. या गढीच्या बुरूजावर गेले तर राजूर गणपतीचा कळस दिसत होता. शिवाय सिल्लोड शहर तसेच भोकरदन शहराचा सर्व भाग या गढीवरून आज ही बघता येतो मात्र बांधकाम अंत्यत जुने झाले असल्याने व पावसामुळे या बांधकामाच्या वीटा जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी या गढीला मध्ये बोगदे पडले आहे. त्यामुळे जास्त धोकादायक असलेला भाग नगर परिषदेच्या वतीने उतरविण्यात आला आहे. मात्र जर पूर्ण गढी उतरावयाची असल्यास त्याचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न सुध्दा प्रशासनासमोर येणार आहे. कारण ही गढी खाजगी मालकीची आहे. शिवाय गढी पाडण्यास या नागरिकांचा विरोध होणार आहे़या गढीचे एक भागीदार सुरेशराव देशपांडे यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांनी गेल्या २०० वर्षा पुर्वी या गढीचे बांधकाम केलेले असून आमची आठवी पिढी या गढीवर वास्तव्य करीत आहे. या गढीचे अर्धे बांधकाम कोरीव दगडाने केलेले असून प्रवेशद्वार कोरीव दगडाने बांधण्यात आले आहे. शिवाय या द्वारावर मोर व लांडोर याचे चित्र कोरलेले आहे. याला एक आख्यायिका आहे. त्यामुळे त्याचे जतन होणे आवश्यक आहे. या गढीचा उर्वरित वरचा भाग हा विटाने बांधण्यात आला आहे. देशपांडे यांनी सांगितले की, माझे ६७ वर्ष वय आहे आतापर्यंत दोन वेळा या गढीची उंची कमी करण्यात आली आहे. सध्या सुध्दा ५० ते ५० फुट गढी आहे गढीचा काही धोकादायक झालेला भाग नगर परिषदेने उतरविला असल्याचे सुरेशराव देशपांडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)