लासूरगाव : जिल्ह्याचे दैवत असलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेस कंकण बांधण्याचा सोहळा मोजक्याच नागरिकांच्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडला. अनेक वर्षांची परंपरा असलेला वार्षिक यात्रा उत्सव यंदाही रद्द झाल्याने मंदिर परिसर भक्तांविना सुनेसुने राहणार आहे.
मंदिराचे पुजारी प्रकाश जोशी व पत्नी सुवर्णा जोशी या दाम्पत्याच्याहस्ते देवीचे पूजन करण्यात आले. सनई-चौघडाचे सुमधुर स्वर, ब्रम्हवृंदाचे मंत्रोपचार, श्री सूक्त पठण, नवग्रह पूजन, महानैवेद्य, आरती सोहळा आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी वेदशास्त्रसंपन्न दीपकगुरू लोकाक्ष, श्रीकांत जोशी, नरेंद्र जोशी यांनी वेदोमंत्राचे पठण केले. त्यानंतर कंकण बांधण्याचा सोहळा पार पडला.
लागलीच मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेऊन मे महिन्यात होणारा वार्षिक यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी यंदाही मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
200421\kishore kulkarni_img-20210420-wa0015_1.jpg
दाक्षायणी मातेचे पूजन करताना पुजारी व उपस्थित मान्यवर