शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बाबा माफ करा! आंतरजातीय प्रेमविवाहानंतर मुलीची आत्महत्या,अंत्यसंस्काराकडे जन्मदात्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:50 IST

अल्पवयीन असताना मुलासोबत पळून गेली, पुन्हा घरी न जाता बालिक झाल्यास त्याचा मुलासोबत केला विवाह

औरंगाबाद : प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमाखातर तिने चार वर्षांपूर्वी आई-वडिलांनाही नाकारल्याची जखम जन्मदात्यांच्या मनात रुजली. तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कळवूनही तिच्या आई-वडिलांनी तिच्या प्रेताकडे पाठ फिरवल्याचा प्रकार मंगळवारी शहर पोलिसांनी अनुभवला.

पूजा आकाश खेडकर (२१, रा. विष्णूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याविषयी जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पूजा ही वयाच्या १७ व्या वर्षी आकाशसोबत पळून गेली होती. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी युगुलाला पकडून आणले, तिचे आई-वडील तिला घरी नेण्यासाठी आले. तेव्हा तिने आई-वडिलांकडे नाही, तर आकाशसोबत राहायचे असल्याचे सांगितले होते. ती अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाच्या आदेशाने पूजाला एक वर्ष सुधारगृहात ठेवले होते. ती १८ वर्षांची झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले. लग्नानंतर दोघे विष्णूनगर येथे राहत होते.

आकाश बॅनर लावण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो कामानिमित्त घराबाहेर पडला. रात्री ३ वाजेच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा पूजाने घराचे दार आतून लावून घेतले होते. आवाज देऊनही ती प्रतिसाद देत नसल्याने जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता, पूजाने गळफास घेतल्याचे दिसले. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.

रक्ताच्या नात्याने फिरवली पाठपूजाच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना कळविली. सायंकाळी तिचे मामा औरंगाबादला आले. पूजाचे आई-वडील येणार नसल्याचे आणि शव तिच्या पतीच्या ताब्यात देण्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.

सुसाईड नोटमध्ये आई, वडील आणि पतीलाही सॉरीपूजाने लिहिलेली सुसाईड नोट पाेलिसांना घटनास्थळी मिळाली. यात तिने आई-वडिलांची आणि पतीची माफी मागितली. ज्याच्यासाठी तुम्हाला सोडले, तोही आता पूर्वीसारखा राहिला नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. तो त्याच्या नातेवाइकांसोबत राहतो. तुम्हीही नाते तोडल्याने एकटे वाटत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले. मृत्यूची घटना आई-वडिलांना कळवावी, मात्र ते येणार नाहीत, यामुळे आकाशनेच अग्निडाग द्यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद