शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सिलिंडरमध्ये एक ते अडीच किलो गॅस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:12 IST

वितरणादरम्यान अनेक ग्राहकांना एक ते अडीच किलोपर्यंत वजन कमी असलेले सिलिंडर मिळाले.

ठळक मुद्दे कमी वजनामुळे नागरिक संतप्त 

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील इंडियन आॅईलच्या सौरभ गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या मापात पाप सुरू असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. कडा कार्यालय परिसरात वितरणादरम्यान अनेक ग्राहकांना एक ते अडीच किलोपर्यंत वजन कमी असलेले सिलिंडर मिळाले. याविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त के ला.

सौरभ गॅस एजन्सीतर्फे कडा कार्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत सोमवारी ग्राहकांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात येत होते. सिलिंडर भरलेल्या वाहनातून एक-एक सिलिंडर रांगेत उभ्या ग्राहकांना देण्यात येत होते. बऱ्याच वेळ उभे राहिल्यानंतर मिळालेल्या गॅस सिलिंडरच्या वजनाविषयी काही ग्राहकांना शंका आली. त्यामुळे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे त्यांनी वजन काट्याची मागणी केली; परंतु यावेळी वजनकाटा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही ग्राहकांनी बाहेर जाऊन सिलिंडरचे वजन केले, तेव्हा दोन ते अडीच किलोपर्यंत वजन कमी आढळले. याविषयी ग्राहकांनी एजन्सीच्या व्यवस्थापकांना माहिती दिली. या प्रकारामुळे गॅस वितरण होणाऱ्या ठिकाणी ग्राहकांनी संताप व्यक्त करीत कर्मचाऱ्याला धारेवर धरले.

याविषयी माहिती मिळताच एजन्सीचे अन्य कर्मचारी वजनकाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सर्वांसमोर सिलिंडरचे वजन करण्यात आले.  यावेळीही सिलिंडरमध्ये वजन कमी असल्याचे स्पष्ट दिसून आले. किरण वाळके, विठ्ठल पारटकर, शांताराम आगलावे, काशीनाथ ढेरे, प्रल्हाद झिंझुर्डे आदी ग्राहकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

एका सिलिंडरमागे ९० रुपयांचा फटकाएकूण २९.६ किलो वजन असलेल्या सिलिंडरमध्ये १४.२ किलो इतका गॅस असतो. सिलिंडरसाठी ६६६ रुपये आकारण्यात येतात. जर एका सिलिंडरचे दोन  किलो वजन कमी भरत असेल, तर त्यापोटी ग्राहकाला किमान ९० रुपयांचा फटका बसतो.

तांत्रिक दोषसिलिंडरमध्ये यंत्राच्या माध्यमातून गॅस भरला जातो. त्यामुळे तांत्रिक दोषामुळे गॅस कमी येऊ शकतो. ज्यांची तक्रार होती, त्यांना सिलिंडर बदलून दिले. वजनकाटा आज विसरला होता. - सौरभ केदारे, सौरभ गॅस एजन्सी

अडीच किलो कमीगॅस लवकर संपत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आज एजन्सीकडून मिळालेले सिलिंडर कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बाहेर त्याचे वजन केले, तेव्हा अडीच किलो वजन कमी होते. १०० ग्रॅमपर्यंत वजन कमी असेल तर चालेल; परंतु दोन-दोन किलो कमी मिळत असेल तर सर्वसामान्य आर्थिक झळ कशी सहन करतील.-किरण वाळके

कारवाई करावी२९ किलो वजन असलेले सिलिंडरचे वजन २७ किलो भरले. ही नागरिकांची फसवणूक आहे. यासंदर्भात प्रशासनाने योग्य पाऊल उचलून कारवाई केली पाहिजे.-शांताराम आगलावे

वजनकाटा नसतोएजन्सीकडून वजनकाटा ठेवलाच जात नाही. आज  जो वजनकाटा होता, तोही खराब होता. यापूर्वीही अनेकदा कमी गॅस मिळालेला आहे.-विठ्ठल पारटकर

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद