शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:14 IST

एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर चौकशी सुरू, राज्यातील रॅकेटचा मास्टरमाइंड फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : विदेशी नागरिकांना विविध प्रकारे जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्ये फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी, आर्थिक व्यवहार केल्याचा संशय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आहे. येथून रोज शेकडो आंतरराष्ट्रीय कॉल करून क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार होत होते. शिवाय, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये विदेशी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, न्यायालयाच्या आदेशाचे बनावटीकरण केलेले कागदपत्रही आढळले. केंद्रीय तपास यंत्रणांना बगल देत होत असलेले हे कॉल व व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायटेक तंत्रज्ञानाचा, विदेशी कागदपत्रांचा देशविघातक कृत्यासाठी देखील वापर केला जात असावा, असा दाट संशय व्यक्त झाल्याने आता गुप्तचर यंत्रणांकडून समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाने सायबर गुन्हेगारांनी कॉल सेंटर उघडले होते. या कॉल सेंटरमध्ये केवळ कर व बँक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे अमेरिका व अन्य देशांतील नागरिकांना कधी धमकावून तर कधी बक्षीस, दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले जात होते. यात भावेश प्रकाश चौधरी (३४), भाविक शिवदेव पटेल (२७), सतीश शंकर लाडे (३५), वलय पराग व्यास (३३), (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोड यांना अटक करण्यात आली. त्यांचा म्होरक्या मास्टरमाइंड आरोपी अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याला गोव्यातून अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने अब्दुल फारुकला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. १५ मिनिटे सरकारी पक्ष व आरोपी वकिलांमध्ये युक्तिवाद चालला. त्यानंतर न्यायालयाने फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या मुद्द्यांवर होईल पुढील तपास-अटकेतील अन्य सहा व फारुकची समोरासमोर चौकशी केली जाईल. ते एकमेकांच्या संपर्कात कसे आले, त्यांना कशा प्रकारे, कुठे प्रशिक्षित केले गेले ?-आतापर्यंत लाखो डॉलर्सची विल्हेवाट कशा प्रकारे लावली? विदेशी नागरिकांचा डेटा कशा प्रकारे चोरी केला?-विदेशातील उच्चपदस्थ अधिकारी, न्यायालयाच्या आदेशाच्या कॉपी कशा मिळवल्या ? त्याचा उद्देश काय ?-जॉन नामक व्यक्तीचा केवळ आयडी मिळाला आहे. त्या नावाने खरंच व्यक्ती आहे की, विदेशातील प्रस्थापित देशविरोधी शक्ती हे रॅकेट चालवत आहे, याचा तपास होणार.

विदेशी तपास यंत्रणा देणार माहितीया कारवाईच्या तपासावर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दखल घेतली जात आहे. विदेशी तपास यंत्रणांनी फसवणुकीच्या प्रकरणांच्या माहितीची पोलिस महासंचालक कार्यालयाला माहिती दिली आहे. त्यातील तथ्य व पुराव्यांची या कॉल सेंटरमध्ये प्राप्त माहितीसोबत खातरजमा केली जाणार आहे. तसा मेल शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांकडून फारुकची तीन तास चौकशीदेशविरोधी कृत्यासह आंतरराष्ट्रीय संबंध आल्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सातत्याने तपासाचा पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मास्टरमाइंड फारुक पकडला जाताच पोलिस आयुक्त (प्रभारी) सुधीर हिरेमठ यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सकाळी १०:३० ते १:३० असे तीन तास कसून चौकशी केली.

रायपूरनंतर फारुकला हवाल्यामार्फत मिळायची आर्थिक रसद-छत्रपती संभाजीनगरपूर्वी रायपूरमध्ये ही कंपनी सुरू होती. मात्र, पोलिसांपर्यंत माहिती गेल्याची कुणकुण लागताच कंपनी थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवण्यात आली. त्यात कंपनीतील साहित्यासह कर्मचाऱ्यांना नेणे, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, कंपनीसाठी जागा, फर्निचरचा सगळ्या खर्चाची जबाबदारी फारुकवर होती.-फारुकने ती यशस्वीरीत्या पार पाडली. त्यानंतर त्याला थेट गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीवरून रोख रक्कम पुरवली जात होती. ज्याद्वारे तो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन खर्च व अन्य नियोजन पार पाडायचा. ही रोख हवाल्यामार्फत पाठवली जात होती. पोलिस आता या पैशांचा व्यवहार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cybercriminals' Call Center Racket: Fraudulent Calls for Anti-National Activities

Web Summary : An international call center in Sambhajinagar defrauded foreigners, raising suspicions of anti-national financial dealings. Authorities suspect misuse of technology and documents. Mastermind Faruk arrested; investigation ongoing into data theft and foreign connections.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम