शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

IPS अधिकाऱ्यांच्या नावे सायबर फसवणूक; राजस्थानातील गावात छ. संभाजीनगरचे पोलिस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:22 IST

इन मिन ४ हजार लोकसंख्येचे गाव, पण बहुतांश उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारीत

छत्रपती संभाजीनगर : व्हीआयपी, पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन ऑनलाईन लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लिली गावापर्यंत पोहोचण्यात जिल्हा सायबर पोलिसांना यश आले. राज्य गुप्त वार्ता विभागाचे अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नावे असेच बनावट अकाउंट तयार करणाऱ्या नरेशकुमार चौधरी (२३) याला त्यांनी अटक करत हे सर्व रॅकेट समजून घेतले.

मे, २०२४ मध्ये लांजेवार जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक असताना त्यांचे नाव, छायाचित्र व पदाचा उल्लेख करून बनावट अकाऊंट तयार केले गेले. आरोपींनी त्यांच्या मित्रांच्या यादीतील अनेकांना ते स्वत: बोलत असल्याचे भासवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशावरून निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांचे पथक तपास करत होते. सहायक निरीक्षक विजयसिंग जोनवाल, अंमलदार नितीन जाधव, दत्ता तरटे व मुकेश वाघ यांनी सखोल तपास केला. हा प्रकार राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून चालत असल्याचे निष्पन्न झाले.

आयपी ॲड्रेस, सीमकार्डवरून काढला मागसोशल मीडियाच्या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार सामान्यत: प्रत्येक अकाऊंटसाठी स्वतंत्र सीमकार्ड वापरतात. पोलिसांनी ते सीमकार्ड, आयपी ॲड्रेसचे सखोल विश्लेषण केले. लांजेवार यांच्या प्रकरणात वापरलेल्या सीमकार्डवरून वारंवार तसे प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून गेल्या आठवड्यात जिल्हा सायबर पोलिस राजस्थानला गेले. नरेशकुमार राहत असलेल्या गावातील बहुतांश तरुण या गुन्हेगारी जगतात आहेत. संबंधित ऑपरेटर त्यांना पैसे मिळाल्यास १० टक्के कमिशन देतात. नरेशकुमार स्वत: पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून बेरोजगार आहे.

दिल्ली पोलिसही याच गावातजिल्हा सायबर पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वी याच गावात दिल्ली सायबर पोलिसांचे पथक देखील येऊन गेले होते. दिल्लीच्या पोलिस आयुक्तांच्या नावे याच गावातून बनावट खाते तयार केले गेले होते.

कायद्याच्या बंधनामुळे सोडावे लागलेयाप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, यात सात वर्षांखालील शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आरोपीला स्थानिक पोलिस ठाण्यात अटक करून नोटीस देऊन सोडावे लागले. जिल्हा पोलिसांकडे अशा प्रकारचे ५ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcyber crimeसायबर क्राइम