शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सायबर भामटे मराठी बोलू लागले, वीज ग्राहकांनो कनेक्शन तोडण्याचे खोटे ‘कॉल’ ओळखा

By साहेबराव हिवराळे | Published: April 11, 2024 7:03 PM

ॲप्लिकेशन डाउनलोड करून खाते साफ : सायबर भामट्यांची शक्कल

छत्रपती संभाजीनगर : महावितरणमधून बोलत आहे. तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरले नाही तर लाइट कट होईल. असे सांगून वीजबिल भरण्याचे सांगून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावून मोबाइलचा ताबा मिळवून भामटे बँक खाते साफ करत आहेत. तेव्हा ग्राहकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणने आवाहन केले आहे.

महावितरण वीजबिल भरण्यासह इतर सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस किंवा व्हाॅट्सॲप मेसेज पाठवण्यात येत नाहीत. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकांची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टिमद्वारेच पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा बंद झाल्यास मेसेज पाठविण्यात येतात. महावितरणचे एकच अधिकृत संकेतस्थळ आहे. यामध्ये ग्राहक सेवेसाठी कन्झुमर ॲपवरून सेवा दिल्या जातात.

भामटे मराठी बोलू लागले...पूर्वी सायबर चोरटे हिंदीतून बोलत असत. आता ते मराठी भाषेचा वापर करत असल्याने नागरिकांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसत आहे. तसेच वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून खात्यातील रक्कम हडपली जात आहे. आपली फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ग्राहकांनी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा लिंक डाऊनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

माहिती देऊ नका...महावितरणकडून वीज ग्राहकांना असे कॉल्स येत नाहीत. असे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावले जात नाही. ग्राहकांनी अनोळखी नंबरवर आपली माहिती देऊ नये. शंका आल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबरवर कॉल करा.- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादelectricityवीजCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम