शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 07:31 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आगळा योगायोग. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. या तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु तिघांनीही गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना एकमेकांच्या भेटीचा इन्कार केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मुक्काम शहरात वाढले आहेत.

मी त्यांना कधीच भेटू शकत नाही...माजी गृहमंत्री देशमुख म्हणाले, फडणवीस यांना मी कधीच भेटू शकत नाही. माझी भेटण्याची इच्छाही नाही. ४ जूनला महाराष्ट्रात चमत्कार दिसेल. आमचा मोठा विजय होईल.

सामंतांनी उत्तर देणे टाळले... उद्योगमंत्री सामंत यांनीही भेटीप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. सामंत ११ मेपर्यंत शहरात मुक्कामी आहेत. ते महायुतीच्या उमेदवारासाठी उद्योजकांच्या विविध संघटनांच्या भेटी घेणार आहेत. 

फडणवीसांनीही नाकारली भेटमाझी व देशमुख यांची भेट झाली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काही तरी बरळत असून त्यांना शिव्या देण्याशिवाय सध्या काहीही सुचत नाही. जनतेने त्यांना रिजेक्ट केलेले आहे. ठाकरेंचे गाइड हे शरद पवार असून ते बोलतील तसेच ठाकरे करतील, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसaurangabad-pcऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४