शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचे सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे मोफत; आरोग्य तपासणी केली का?

By संतोष हिरेमठ | Updated: December 19, 2023 16:20 IST

अभियान : अनेक तरुणांना आजाराचे निदान, शस्त्रक्रियेचीही वेळ

छत्रपती संभाजीनगर : सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे करायचा म्हटला की, किती पैसे लागेल, असा प्रश्न पडतो. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १८ वर्षांवरील तरुणांच्या विविध तपासण्या अगदी मोफत केल्या जात आहे. त्यातूनच अनेकांना मधुमेह, उच्चरक्तदाब अशा आजारांचेही निदान झाले आणि वेळीच उपचारही सुरू झाले.

‘आयुष्यमान भव’ अभियानात १८ वर्षांवरील तरुणांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग वाढल्याचे दिसते. रुग्णालयात जाईपर्यंत अनेक तरुणांना आपल्याला काही आजार असेल, याची पुसटशीही कल्पना नसते. परंतु मोफत तपासणी केली आणि काहींना उच्चरक्तदाब, तर काहींना मधुमेह तर काहींना इतर आजारांचे निदान झाले. काहींवर शस्त्रक्रियेचीही वेळ ओढावली.

काय आहे ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियान?राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव मोहिमेंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे-वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

या तपासण्या होतात मोफतआरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये १८ वर्षांवरील तरुणांची रक्तदाब, मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार, एचआयव्ही, तोंडाचा कर्करोग, मनोविकार आदी आजार आणि त्यासाठी आवश्यक रक्त तपासण्या, सीटी स्कॅन, एक्स-रे आदी तपासण्या मोफत केल्या जात आहेत.

कोठे कराल मोफत तपासणी?आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून, तर जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी तपासणी केली जात आहे. ज्यांना विविध तपासण्या करण्याची गरज आहे, त्यांना आरोग्य केंद्रातून, उपकेंद्रातून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते.

जिल्ह्यात नऊ लाख तरुणांची मोफत तपासणीया अभियानात आतापर्यंत ९ लाख २२ हजार ९७१ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील ९ लाख १३ हजार २६३ जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर यांनी दिली.

एक हजार जणांवर शस्त्रक्रियाज्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशांना शासकीय रुग्णालयासह शासकीय योजना लागू असलेल्या खाजगी रुग्णालयात संदर्भित केले जाते. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत एक हजार सात जणांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले.

जिल्ह्यात चांगली कामगिरीहे अभियान दि. ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी मोफत तपासणी केली जात आहे. या अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.-डाॅ. भूषणकुमार रामटेके, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद