शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पिकांना जीवदान मिळणार; जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून खरीप संरक्षित पाळी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 20:12 IST

लाभक्षेत्रातील ३८६ गावातील शेतकऱ्यांना दिलासा! 

पैठण: पावसाने गेल्या  अनेक दिवसापासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी ( दि. १) दुपारी १०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सोडण्यात आला. हळूहळू विसर्गात वाढ करण्यात येणार असून २५ दिवस खरीप संरक्षित आवर्तन सुरू राहणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. खरीपासाठी पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने लाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांनी खरीप पिके वाचवण्यासाठी जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी केली होती. दरम्यान पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खरीप हंगामासाठी पाणीपाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या निर्णयानुसार शुक्रवारी डाव्या कालव्यातून दुपारी दोन वाजता १०० क्युसेक्सने विसर्ग प्रारंभ करण्यात आला. विसर्ग हळूहळू वाढवून १००० क्युसेक्स पर्यंत करण्यात येणार आहे.  पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावातील १८३३२२ हेक्टर क्षेत्रातील खरिप पिकांना पाण्याची  गरज होती, धरणातून आवर्तन मिळालज नसते तर पिके हातातून जाण्याची धोकादायक परिस्थिती उदभवली होती.

धरणात सध्या ३३%  जलसाठा उपलब्ध असल्याने खरिप पिका साठी एक आवर्तन सोडण्यात यावे अशी जोरदार  मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.  डावा कालव्यावर १४१६४० हे. सिंचन जायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात औरंगाबाद - ७६२० हे,  जालना - ३६५८० हे,  परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली असून पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी पिके धोक्यात आली आहेत. 

उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा  आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात औरंगाबाद - १४३२ हे,  बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे या पिकांनाही  पाण्याची गरज आहे यामुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पैठण तालुक्यातील ९०५२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना फायदा....पैठण तालुक्यात डाव्या कालव्यावर ७६२० हे क्षेत्र व उजव्या कालव्यावर १४३२ हे. क्षेत्रातील २८  गावात खरिपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे पावसाने दडी मारल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खेर्डा प्रकल्पासहीत आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा. तालुक्यातील खेर्डा प्रकल्प कोरडा पडला आहे. ब्रम्हगव्हान सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पात पाणी सोडावे तसेच आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण