शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांवर टीका केल्याने वड्डेटीवारांच्या ओबीसी मेळाव्यात समता परिषदेचा गोंधळ

By सुमेध उघडे | Updated: December 5, 2020 16:29 IST

समता परिषदेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर जमा होऊन भुजबळ यांनी काय पाप केले ? याचा जाब विचारला.

ठळक मुद्देबालाजी शिंदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीमेळाव्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला.

औरंगाबाद : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेडीवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात प्रास्ताविकामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्त्ये शांत झाले आणि मेळावा पार पडला. 

करमाड येथे मदत व  पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुरु होणारा मेळावा दुपारी २ वाजता सुरु झाला. बालाजी शिंदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना छगन भुजबळ यांनी पिवळ्या झेंड्याला राष्ट्रवादीकडे नेत ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे पाप केले अशी टीका केली. मेळाव्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. दहा ते बारा कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर जमा होऊन बालाजी शिंदे यांना भुजबळ यांनी काय पाप केले ? याचा जाब विचारला. यामुळे गोंधळ उडाला. काही वेळानंतर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी करत माईकचा ताबा घेतला. छगन भुजबळ आमचे नेते असून आमचे आदर्श आहेत असे म्हणत वड्डेटीवार यांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत केले. यानंतर त्यांनी अर्धातास मार्गदर्शन केले.

समता परिषदेची दिलगिरी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे मेळाव्यात गोंधळ उडाला. यावर मेळाव्याच्या शेवटी समता परिषदेच्या मनोज घोडके यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जाती