शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कोरोनानंतर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसायावर संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:32 IST

‘bird flu’ in Marathwada शासनाच्या सूचना येण्यापूर्वीच अनेक ठिकाणच्या पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतर १ किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील पोल्ट्रींमधील पक्षी नष्ट करणार लातूर, परभणी जिल्ह्यातील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ‘इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स’ थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यात ‘बर्ड फ्ल्यू’च्या संक्रमणाचा धोका वाढला असून, यामुळे पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत आली आहे. या साथरोगाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी विभागातील पोल्ट्री फार्म आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.

इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स थांबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच १ कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांची तपासणी केल्यानंतर जर त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न होत असेल, तर ते पक्षी नष्ट करण्याबाबतदेखील विचार सुरू झाला आहे. मराठवाड्यात बर्ड फ्ल्यू आला आहे, हे निश्चित आहे. यापूर्वी पक्ष्यांमध्ये हा आजार येऊन गेला आहे. कोरोनाप्रमाणेच प्राण्यांमध्ये या आजाराचे संक्रमण होते. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेने काम करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय सुत्रांनी सांगितले की, आज बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व पोल्ट्रींची तपासणी करण्याचे नियोजन आहे. एक कि़लोमीटर अंतरातील पोल्ट्रींबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. शासनाच्या सूचना येण्यापूर्वीच अनेक ठिकाणच्या पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लातूर, परभणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. जिथे-जिथे धोक्याची शक्यता आहे, तेथील नमुने संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच ‘इंटरमिक्सिंग आॅफ बर्ड्स’ थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. मराठवाड्यात बर्ड फ्ल्यू आलेला आहे, हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पक्ष्यांमध्ये हा आजार येऊन गेला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आढावामुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्री ८ वाजता विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी विभागात कोरोना लसीकरणाबाबत काय तयारी झाली आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हानिहाय परिस्थितीबाबत समन्वयाने खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. या व्हि. सी.ला विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा