शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:10 IST

मुकुंदवाडी गँगवाल्यांच्या हवाली करून पोलिस यंत्रणा नामानिराळीच

छत्रपती संभाजीनगर : ‘मकोका’सारख्या गंभीर कारवाईनंतर नुकत्याच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांच्या टोळीने पुन्हा एकदा उच्छाद मांडणे सुरू केले आहे. एका तडीपार गुन्हेगाराने पोलिसालाच मारहाण केली. तर १९ वर्षीय तरुणाला रक्तबंबाळ करून लुटले. या दोन घटना ताज्या असताना १७ गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या मुकेश महेंद्र साळवे याने मुकुंदवाडीत मंगळवारी एका तरुणावर दीड फूट लांब चाकूने हल्ला केला. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी त्याने एका इलेक्ट्रिशियनवर हल्लाही केला होता. मात्र, त्यात गुन्हा दाखल झाला नाही.

बाळू मकळे (२८, रा. मुकुंदनगर) हा २ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घरासमोर खेळत होता. मुकेशने तेथे जात अचानक बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘मी आताच मकोका लागल्यानंतर बाहेर आलो आहे, मी मुकुंदवाडीचा दादा आहे, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत मारहाण केली. ‘तू मला का भिडतो,’ असे म्हणत कंबरेला लावलेला अंदाजे दीड ते दोन फूट लांब धारदार चाकूने घाव घालून बाळूवर हल्ला केला. रुग्णालयात उपचार घेऊन बाळूने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुकेशवर गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला २ दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे वायाळ यांनी सांगितले.

तीन दिवसांपूर्वी टोळी समोरासमोर, एका तरुणावरही प्राणघातक हल्ला- मार्च महिन्यात विकी ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे (३३), मुकेश ऊर्फ मुक्या साळवे (२७), बालाजी पिवळ (३२), किशोर शिंदे, उमेश गवळी, रोहित म्हस्के, अजय ऊर्फ आज्या आदमाने, सुंदरू कांबळे, संकेत लांबदांडे यांनी व्यापाऱ्याला खंडणी मागत प्राणघातक हल्ला केला. हवेत गोळीबारही केला होता. त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करत अटकही झाली. मात्र, ऑगस्टमध्ये हेल्मेट वगळता सर्व आरोपी जामिनावर सुटले.- बाहेर येताच त्यांनी मुकुंदवाडीत उच्छाद मांडला. तीन दिवसांपूर्वी गुन्हेगारांच्या २ टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.- ६ दिवसांपूर्वी मुकेशने लोखंडे नामक इलेक्ट्रिशियनवर प्राणघातक हल्ला केला. त्याला जवळपास ८ टाके पडले. मात्र, पोलिसांकडे तक्रार न देण्यासाठी या टोळीने त्याला रुग्णालयात जाऊन धमकावले. परिणामी, त्यात गुन्हाच दाखल झाला नाही.

तिघांचे मिळून १०८ गुन्हेविकी, मुकेश व बालाजी या तीन गुन्हेगारांवर एकूण गंभीर स्वरूपाचे १०८ गुन्हे आहेत. त्यात विकी, बालाजीवर प्रत्येकी ४६ तर मुकेशवर १६ गुन्हे आहेत. तरीही मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हे राजरोस गुंडगिरी, हप्ते, खंडणी मागत फिरतात. त्यामुळे मुकुंदवाडीतील काही ठरावीक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सायबर पोलिस करतात काय?या सर्व टोळ्यांकडून अजूनही नशा करताना, शस्त्रांसह सोशल मीडियावर राजरोस स्टेटस ठेवले जात आहे. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. सायबर पोलिसांकडून मात्र उपायुक्तांच्याच आदेशाला फाटा दिला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी