जालना : जिल्ह्यात तीन ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.परतूर तालुक्यातील वाघोडा तांडा येथे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष सुदाम पवार यांच्या फिर्यादीवरून बाबू लालसिंग राठोड, अमोल बाबू राठोड, शरद लोमटे आणि अन्य एका महिलेविरूध्द परतूर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत पेट्रोल आणण्यासाठी पैसे का दिले नाही या क्षुल्लक कारणावरून मारहाण करून जखमी केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील पांगरा तांडा येथे घडली. दिलीप अजीत वायाळ यांच्या फिर्यादीवरून अण्णा वायाळ, राजाराम अण्णा वायाळ, संतोष अण्णा वायाळ, अंगत राजाराम वायाळ याच्याविरूध्द घनसावंगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडीत येथील शेतवस्तीवर मारहाणीची घडली. भानुदास पांडूरंग गाढवे यांच्या फिर्यादीवरून तेजराव पांडुरंग गाढवे याच्याविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
मारहाणीप्रकरणी तीन ठिकाणी गुन्हे
By admin | Updated: October 1, 2016 01:09 IST