फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा
By Admin | Updated: March 6, 2017 00:45 IST2017-03-06T00:45:11+5:302017-03-06T00:45:11+5:30
मुदत ठेव (एफडी) रकमेवर व्याजदर देण्याचे आमिष दाखवून मुदत ठेवीसाठी एका वृद्धाकडून घेतलेली रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या खात्यावर जमा केली
_ns.jpg)
फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : मुदत ठेव (एफडी) रकमेवर व्याजदर देण्याचे आमिष दाखवून मुदत ठेवीसाठी एका वृद्धाकडून घेतलेली रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या खात्यावर जमा केली. वृद्धाची १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गणेश तुपके (रा. म्हाडा कॉलनी, मोरवाडी, सध्या नेहरुनगर, पिंपरी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांकडे दाखल असलेला हा गुन्हा खडकी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
श्याम मोकादम यांच्याकडून गणेश तुपके या आरोपीने २०१४ ते २०१६ या कालावधीत वेळोवेळी १७ लाख रुपये जमा केले. खऱ्या पावत्यांमागे मोकादम आणि साक्षीदाराच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यांच्या मुदत ठेवीसाठी दिलेल्या रकमा बँकेत भरल्या नाहीत. या १७ लाख रुपये रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोकादम यांनी बँकेत चौकशी केल्यावर त्यांच्या नावे मुदत ठेव रक्कम जमा नसल्याचे समजले. पैसे जमा न झाल्याचे लक्षात येताच मोकादम यांनी पोलिसांकडे धाव घेतली.(प्रतिनिधी)