शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विनापरवाना रेखांकन व बांधकाम करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:26 IST

अनधिकृत रेखांकन व बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकांविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरूकेली आहे.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या खाजगी गटनंबरमध्ये अनधिकृतपणे रेखांकन, बांधकाम करून भूखंड व घरांची विक्री करणाऱ्यांवर सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सूचना देऊनही अनधिकृत रेखांकन व बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकांविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरूकेली आहे.  

वाळूज महानगर परिसरात सिडको अधिसूचित येणाऱ्या वडगाव कोल्हाटी, शरणापूर, साजापूर आदी ठिकाणी सिडकोची परवानगी न घेता अनेकांनी खाजगी जमिनीवर प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जणांनी लेआऊट मंजूर करून घेत रेखांकन केले आहे, तसेच घरे बांधली आहेत. हा प्रकार लक्षात येताच सिडको प्रशासनाने २००७ पासून संबंधित प्लॉट व घराच्या नोंदी घेऊ नयेत म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा निबंधक यांना पत्रव्यवहार केला आहे. 

तरीही सर्रास बिल्डरांकडून प्लॉट व घरांची खरेदी-विक्री केली जात असून, स्थानिक ग्रामपंचायतीला नोंदीही घेतल्या जात आहेत. या अनधिकृत नागरी वसाहतीत ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, रस्ते, पथदिवे आदी नागरी सुविधा कोण पुरविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

या गटनंबरमध्ये अनधिकृत प्लॉटिंग..सिडको व पंचायत समितीच्या पथकाने संयुक्त पाहणी केली. त्यात वडगाव कोल्हाटी हद्दीतील गटनंबर, ५, ६, ७, ९, १०, १०/१, १०/२, ११, १२ मधील हनुमाननगर, विश्व टी, माऊलीनगर, छत्रपती प्लॉटिंग, स्वास्तिक डेव्हलपर्स, श्रीराम प्लॉटिंग, एकदंत रेसिडन्सी व शरणापूर ग्रा.पं. हद्दीतील शेकापूर उडाणमधील गटनंबर ५ आणि ६ मध्ये अनधिकृत रेखांकन व बांधकाम सुरू असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने संबंधित नागरिकांना रेखांकन आणि बांधकामास मनाई केली आहे. 

सिडको अधिसूचित क्षेत्रातील अनधिकृत प्लॉटिंग व बांधकाम करणाऱ्यांवर सिडको प्रशासनाने यापूर्वीही पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, गुन्हेही दाखल केले आहेत. सूचना देऊनही रेखांकन व बांधकाम थांबविले गेले नाही, तर संबंधित बांधकामधारकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सिडकोचे अतिक्रमण हटाव पथक प्रमुख गजानन साटोटे यांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWalujवाळूजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcidco aurangabadसिडको औरंगाबाद