शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिली तक्रार

By राम शिनगारे | Updated: June 23, 2023 22:01 IST

जुगार अड्डे बंद करण्यासाठी केले आंदोलन

छत्रपती संभाजीनगर :पोलिस आयुक्तालयाच्या समोर नग्न आंदोलन करणाऱ्या एकजणाच्या विरोधात उपस्थित महिला पोलिस कर्मचाऱ्याने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्यामुळे विनयभंगाची तक्रार दिली. त्यानुसार बेगमपुरा पोलिस ठाण्यात आंदोलनकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.रमेश विनायक पाटील (रा. गुलमंडी, दलालवाडी) असे आरोपी आंदोलनकर्त्याचे नाव आहे.

रमेश पाटील यांनी शहरात सोशल क्लबच्या नावाखाली अनेक जुगार अड्डे सुरू आहेत. हे जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्तालयासमोर नग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आयुक्तालयाच्या समोर तगडा बंदोबस्त तैनात केला होता. महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील हे एका दुचाकीवर पाठीमागे अंगावर शॉल पांघरून बसले होते.

दुचाकीवरून उतरताच त्यांनी अंगावरील शॉल काढुन घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा त्यांच्या अंगावर फक्त छोटी निकर होती. अशा अवस्थेत उभे राहुन प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करीत होते. सार्वजनिक ठिकाणी महिलांना लज्जा निर्माण होईल, असे त्यांचे हावभाव होते. त्यामुळे माझ्यासह बंदोबस्तावरील महिला अधिकारी व अंमलदारांच्या मनास या प्रकारामुळे लज्जा वाटुन आमचा विनयभंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पाटीलच्या विरोधात बेगमपुऱ्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.बायको हवी म्हणून लावले होते बॅनर

रमेश पाटील हे हटके आंदोलन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शहरात महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको हवी असल्याचे बॅनर लावले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय रमेश पाटील हे कायम वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करीत असतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस