शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडमध्ये विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:29 IST

sexual harassment of girl student in school या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कन्नड - प्रयोग शाळेची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या आरोपावरुन दोन शिक्षकांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आंबातांडा येथील नवजिवन माध्यमिक व उच्च माध्यमिक रुपा नाईक विद्यालयात ही घटना घडली असून अनुप राठोड (३०) व संदीप शिखरे (३२) असे आरोपी शिक्षकांची नावे आहेत. 

कोरोना प्रादुर्भावानंतर आता महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. तालुक्यातील तालुक्यातील आंबातांडा येथील नवजिवन माध्यमिक व उच्च माध्यमिक रुपा नाईक विद्यालयात प्रयोग शाळा अनेक दिवस बंद असल्याने शुक्रवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनींकडून याची स्वच्छता करण्याचे ठरवले. यासाठी तीन विद्यार्थ्यांनी घेऊन प्राचार्य प्रयोग शाळेकडे आले. त्यानंतर ते कुलुपाची चावी आणण्यासाठी गेले. तर इतर दोन मुली कामानिमित्त बाहेर गेल्या. यामुळे तिथे एकच मुलगी उभी होती. याचा गैरफायदा घेत समोर उभ्या अनुप राठोड व संदीप शिखरे यांनी तिची छेड काढली.  

पीडित मुलीने याप्रकरणी या शिक्षकांच्याविरूद्ध पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यावरुन बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण आधिनियम २०१२ चे कलम ८,१० व १२,भादवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि.प्रदीप भिवसने करित आहेत. दोन्ही आरोपी फरार आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी