औरंगाबाद : बालकांची अश्लील चित्रफीत फेसबुकवर अपलोड करणाऱ्या मोबाईलधारकाविरुध्द सायबर पोलिसांनी शनिवारी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविला.
बालकांचा अश्लील कृत्यासाठी वापर करणाऱ्या समाजकंटकाविरुध्द केंद्रीय गृहमंत्रालयाने विशेष मोहीम उघडली आहे. यांतर्गत फेसबुकवरील अमन अमन या नावाचे अकाउंट असलेल्या वापरकर्त्याने लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ क्लिप शेअर केल्याचे दिसून आले. हा वापरकर्ता औरंगाबाद शहरातील असल्याचा अहवाल आणि सीडी, छायाचित्रासह मुंबई येथील महाराष्ट्र सायबर विभागाकडून सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त झाला. यानंतर पोलीस निरीक्षक गीता बागवडे, कॉन्स्टेबल सुदर्शन एखंडे यांनी तपास करून आरोपीचे नाव निष्पन्न केले. आरोपी कटकटगेट परिसरातील असल्याचे स्पष्ट होताच एखंडे यांनी शनिवारी सरकारतर्फे जिन्सी ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.