शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:49 IST

जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे‘सीईओं’ची माहिती : पहिल्या दिवशी झाली ३८ जणांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले की, ‘एलसीडी’वर तालुकानिहाय रिक्त जागा दाखविण्यात आल्या. कर्मचाºयांच्या पसंतीनुसार बदल्यांना प्राधान्य देण्यात आले; परंतु काही ठिकाणी रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी कर्मचाºयांनी मागितलेल्या जागांवर त्यांची बदली करता आली नाही. यामध्ये औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांना जास्त पसंतीक्रम होता. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नेमक्या याच ठिकाणी अत्यल्प रिक्त जागा असल्यामुळे त्या जागांवर बदलीने पदस्थापना देण्याचे टाळले.आज शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशन पद्धतीने कर्मचाºयांची बदली करण्यात आली. यंदा विविध विभागांत कार्यरत १०२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, तर विनंतीवरून १६४ बदल्या प्रस्तावित आहेत़ बदलीची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून, आज सकाळपासून जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनची प्रक्रिया राबविण्यात आली.सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सामान्य प्रशासन, दुपारी १ ते ४.३० वाजेपर्यंत महिला व बालविकास विभाग, तर ४.३० वाजेपासून पुढे वित्त विभागाच्या बदल्या करण्यात आल्या.सोमवारी १४ मे रोजी शिक्षण विभाग, पशुसंवर्धन आणि कृषी विभाग, तर १५ मे रोजी बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचन विभाग तसेच आरोग्य, पंचायत विभागांतील बदलीपात्र कर्मचाºयांची समुपदेशन पद्धतीने बदली केली जाणारआहे.संवर्गनिहाय झालेल्या बदल्याआज सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहायक प्रशासन अधिकारी- १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-४, वरिष्ठ सहायक- ५ आणि कनिष्ठ सहायकांच्या- १८, एकात्मिक बालविकास विभागातील पर्यवेक्षिकांच्या ७, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकार- २ आणि कनिष्ठ सहायक (लेखा)- १, अशी एकूण ३८ कर्मचाºयांची बदली करण्यात आली.आंतरजिल्हा बदलीने ३४४ शिक्षकांपैकी लातूर जिल्ह्यात जाणारे १३ शिक्षक सोडले, तर ३३१ शिक्षकांना काल कार्यमुक्त करण्यात आले. उद्या शनिवारी राज्यस्तरावरून जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश येण्याची शक्यता मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली