शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

‘पीओपी’ मूर्तीवरची बंदी कोर्टाने उठवली; कारागिरांना येणार ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:37 IST

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मूर्ती दान योजना पर्यावरणाला अत्यंत पूरक

छत्रपती संभाजीनगर : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनविण्यावर असलेली बंदी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने उठविल्यावर शहरातील मूर्तिकारांमध्ये आनंदाची लाट पसरली. शाडू मातीच्या तुलनेत यंदा शहरात हजारोंच्या संख्येने पीओपी मूर्ती तयार होतील. यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शहरातील ९९ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम आणि मनपाने तयार केलेल्या विजर्सन विहिरींमध्ये केल्या जाते. महापालिकेने २ वर्षांपासून मूर्तींचा पुनर्वापर करण्यासाठी मूर्तिदान योजना आणली. ही योजना मूर्तिकारांसाठी नवीन संजीवनी देणारी ठरत आहे.

शहरात गणेश मूर्तीसह अन्य मूर्ती तयार करणारे जवळपास २० पेक्षा अधिक लहान- मोठे कारागीर आहेत. वर्षभर मूर्ती बनविणे हा त्यांचा एकमेव व्यवसाय आहे. दरवर्षी शहरात ८० ते ९० हजारांहून अधिक मूर्तींची विक्री गणेशोत्सवात होते. न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी आणल्यानंतर या क्षेत्रातील कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. अनेक कारागीर दरवर्षी अहिल्यानगर आणि अन्य शहरांतून तयार मूर्ती आणून विकण्याचे काम करीत होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पीओपी मूर्ती तयार करण्यास परवानगी दिल्याने कारागीर बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शाडू मातीसाठी कोणते कष्ट...शाडू मातीची मूर्ती तयार करण्यासाठी कष्ट आणि पैसा खूप लागतो. एवढे करूनही मूर्तीला पाहिजे तशी सुंदरता येत नाही. अनेकदा मूर्ती उन्हात वाळविण्यासाठी ठेवल्यावर तडे जातात. शाडू मूर्तीला रंगकाम करणे अत्यंत क्लिष्ट काम असते. अत्यंत छोटी शाडू मातीची मूर्ती एक हजार ते बाराशे रुपयांना विकावी लागते. अनेकदा भाविकांना मूर्ती खूप महाग वाटते.

पीओपी बजेटमध्येपीओपीपासून मूर्ती तयार करणे कारागीर बांधवांसाठी अत्यंत सोपे काम असते. मूर्तीला पाहिजे तसा आकार, सौंदर्य खुलविता येते. उन्हात वाळविताना तडे जाण्याची भीती अजिबात नसते. रंगकाम करणे सोपे जाते. शाडू मूर्तीची किंमत १ हजार तर पीओपीची अवघी २०० ते २५० रुपये असते. भाविक पीओपी मूर्तीला अधिक पसंती देतात.

मनपाकडून ५० ठिकाणी मूर्ती संकलनगणेश विसर्जनाच्या दिवशी मनपाकडून शहरात ५० ठिकाणी तात्पुरते मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येतात. २०२४ मध्ये मनपाकडे २७ हजार ७६० मूर्ती जमा झाल्या होत्या. ३ हजार ७४८ मूर्ती भाविकांनी, गणेश मंडळांनी दान स्वरूपात दिल्या. २२ हजार ५५८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

पर्यावरणपूरक उपक्रममनपाकडे दान स्वरूपात आलेल्या मूर्ती परत मूर्तिकारांना मोफत स्वरूपात दिल्या जातात. मूर्तिकार वर्षभर या मूर्ती सांभाळून ठेवतात. दुसऱ्या वर्षी रंगकाम करून परत त्या विक्रीस आणतात. पर्यावरणाच्या दृष्टीने या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे.

१६ ठिकाणी विसर्जनाची सोयशहरात महापालिकेकडून १६ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात येते. यामध्ये ८ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. ८ ठिकाणी पारंपरिक विसर्जन विहिरींवर व्यवस्था केलेली असते.

आनंदाची बाबमुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्ती तयार करण्यास परवानगी दिली ही आनंदाची बाब आहे. यावर्षीपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती तयार होतील. कृत्रिम तलाव, विसर्जन विहिरींमध्ये विसर्जन केल्यास पर्यावरणाला कोणताही धोका नाही. दान स्वरूपात मूर्ती देण्याचा उपक्रमही चांगला आहे.- सचिन परदेशी, मूर्तिकार.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर