शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस; करुणा यांची तक्रार, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:55 IST

२४ फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

मुंडे यांनी २०२४ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघ-२३३ मधून निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ‘ऑनलाइन’ तक्रार दाखल केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरून न्यायालयाने बीएनएसएस कायद्यानुसार वरीलप्रमाणे आदेश केल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.

खरी माहिती देणे बंधनकारकलोकप्रतिनिधी कायदा १९९१ च्या कलम ३३ (अ) नुसार खरी माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती दिल्यास कलम १२५ (अ) नुसार ६ महिने शिक्षेची तरतूद आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला खासगी तक्रार करण्याचा अधिकार आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBeedबीडCourtन्यायालय