शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

दोन दिवसांत ३६९ एकरची मोजणी करा

By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST

औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही भूमाफियांनी तर तलावाच्या जमिनीवर प्लॉटिंगही पाडली आहे.

औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही भूमाफियांनी तर तलावाच्या जमिनीवर प्लॉटिंगही पाडली आहे. दोन दिवसांत ३६९ एकर ३७ गुंठे जमिनीची मोजणी करून द्या, अशी मागणी मनपाने बुधवारी भूमिअभिलेख विभागाकडे एका पत्राद्वारे केली. मनपाने २००३ मध्ये जमीन मोजणीसाठीच ८१ लाख रुपये भरले होते. मात्र, त्यावेळी मोजणी पूर्ण झाली नव्हती.हर्सूल तलावातील पाण्यावर टँकरमाफिया कशा पद्धतीने दरोडा टाकत आहेत यावर ‘लोकमत’ने १७ एप्रिलच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. हर्सूल तलावाच्या साडेतीनशे एकर जागेवर ठिकठिकाणी भूमाफियांनी बळकावल्याचे वृत्त दिले होते. हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी मनपाचे अधिकारी का नकारघंटा वाजवत आहेत आदी मुद्दे प्रकाशात आणले होते. या विशेष वृत्ताची दखल विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी घेतली. मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली. पाहणीनंतर मनपाला त्वरित जमीन मोजणीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. हर्सूल तलावाच्या परिसरात झालेली अतिक्रमणेही जमीनदोस्त करावी, प्लॉटिंग निष्कासित करावी, असेही आदेश त्यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करताना बुधवारी मनपाच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाला जमीन मोजणी करून देण्याची विनंती केली. मनपाने यापूर्वी ८१ लाख रुपये आपल्या कार्यालयाकडे भरले आहेत. दोन कोटी रुपये खर्च करून मनपा हर्सूल तलावातील गाळ काढणार आहे. शेतीचा पोत सुधारण्यासाठी दरवर्षी शेतकरी तलावात माती नेण्यासाठी येतात. टँकर आणि भूमाफिया त्यांना हाकलून लावतात. मनपाने मोफत गाळ नेण्यास मुभा द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.